पुणे: जुन्नरमध्ये कृषीपंपांच्या केबल चोरणारे दोघे गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नारायणगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: नारायणगाव व जुन्नर परिसरात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड करत १०० किलो तांब्याच्या तारा, केबल व टेम्पो असा एकूण ४ लाख ३० हजार ८४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.

पुणे: जुन्नरमध्ये कृषीपंपांच्या केबल चोरणारे दोघे गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नारायणगाव (पुणे) वृत्तसेवा: नारायणगाव व जुन्नर परिसरात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या केबल चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड करत १०० किलो तांब्याच्या तारा, केबल व टेम्पो असा एकूण ४ लाख ३० हजार ८४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली. विशाल सुखदेव चव्हाण (वय २५) व सुरेश मारुती पंच (वय ३८, दोघेही रा. पंचलिंग वस्ती, जुन्नर) अशी पोलिसांनी अटक केलेल्या केबल चोरांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुरुवारी (दि. २४) गस्तीवर होते. यावेळी पथकाला एका टेम्पोतून कृषि पंपांच्या केबल नेल्या जात असल्याचे दिसून आले. त्यानुसार पथकाने टेम्पोचा पाठलाग केला. नारायणगाव बायबास येथे टेम्पो अडवण्यात आला. यावेळी टेम्पोतील विशाल व सुरेश या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली. त्यांनी केबल मांजरवाडी, नारायणगाव, येणेरे, जुन्नर येथून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच टेम्पोमध्ये इतर लहान-मोठ्या जाळलेल्या जवळपास १०० किलो वजनाच्या तांब्याच्या तारा मिळून आल्या. पुढील कारवाईसाठी दोघांना नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस उपनिरीक्षक अभिजित सावंत, पोलिस हवालदार दिपक साबळे, राजू मोमीन, पोलिस नाईक संदीप वारे, पोलिस शिपाई अक्षय नवले, निलेश सुपेकर, होमगार्ड. आकाश खंडे यांच्या पथकाने केली.