Rahul Gandhi: मोदी आडनावाचा अवमान; राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा, सुरत न्यायालयाचा निर्णय

Rahul Gandhi News: मोदी आडनावावरून टीका केल्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर लगेचच त्यांना जामीन देखील मंजूर करण्यात आला.

Rahul Gandhi: मोदी आडनावाचा अवमान; राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा, सुरत न्यायालयाचा निर्णय

सुरत: काँग्रेसचे खासदार यांना सुरत येथील कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. मानहानी प्रकरणात कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. मोदी नावावर टीका केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात सुरत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर टीका करताना म्हटले होते की, सर्व चोरांची नावे मोदी कशी काय?, कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर गांधी यांनी तातडीने जामीनासाठी अर्ज देखील केला आणि न्यायालयाने त्यांची शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित देखील केली. आजच्या सुनावणीसाठी राहुल गांधी सुरत कोर्टात हजर होते. निर्णय देण्याआधी कोर्टाने राहुल गांधी यांना विचारले की, तुम्हाला यावर काही बोलायचे आहे का? त्यावर राहुल गांधी म्हणाले, मी नेहमी भ्रष्ट्राचाराच्या विरोधात बोतो. मी कोणाविरुद्ध मुद्दाम बोललो नाही. यामुळे कोणाचे नुकसान झाले नाही.

राहुल गांधींनी दोन वर्षापूर्वी मोदी आडनावावर वक्तव्य केले होते. कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला त्याच बरोबर शिक्षा ३० दिवसांसाठी स्थगित देखील केली. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या संदर्भात वक्तव्य केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या शिक्षेच्या विरोधात राहुल गांधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात.मानहानी प्रकरणाच्या सुनावणीसाठी राहुल गांधी सुरतमध्ये आले होते. सकाळी ११च्या सुमारास ते कोर्टात हजर झाले. कोर्टाने आयपीसी कलम ५०४ नुसार त्यांना दोषी ठरवले. गांधींच्या विरोधातील मानहानीची दोन प्रकरणं होती एक कलम ४९९ तर दुसरे कलम ५०४ नुसार होते. यात त्यांना ५०४ नुसार दोषी ठरवण्यात आले, ज्यात दोन वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे.सुरतमध्ये झालं स्वागत सुनावणीसाठी सुरतमध्ये पोहोचलेल्या राहुल गांधी यांचे विमानतळावर जोरदार स्वागत झाले. विमानतळाबाहेर स्वागताचे पोस्टर लावण्यात आले होते, यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ते जुलै २०२० मध्ये कोर्टात आले होते.