Share Market Opening: बाजारात उलथापालथ, सेन्सेक्स-निफ्टीच्या घसरणीतही इथे कमाईची चांगली संधी!

Share Market Opening Today: आठवड्याचा पहिला दिवस देशांतर्गत शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी घेऊन आला आहे. आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (२७ मार्च) बाजारात वाढीसह सुरुवात झाली आहे. आज देशांतर्गत मार्केट सुरु होण्याच्या वेळी बँक निफ्टी देखील सुरुवातीला लाल चिन्हात उघडला तरी उर्वरित निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत.

Share Market Opening: बाजारात उलथापालथ, सेन्सेक्स-निफ्टीच्या घसरणीतही इथे कमाईची चांगली संधी!

मुंबई : आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजाराच्या सुरुवातीला दोन्ही निर्देशांकात किरकोळ वाढीसह व्यवहार होत आहे. शुक्रवारी मोठ्या घसरणीनंतर आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार हिरव्या चिन्हावर उघडला. यूएस फ्युचर्सच्या संकेतामुळे भारतीय बाजाराला पाठिंबा मिळतोय. बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये १०० हून अधिक अंकांची उसळी पाहायला मिळत असताना निफ्टी १७,००० अंकांच्या अगदी जवळ झेपावला आहे.आजच्या व्यवहारात बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ३९.८० अंक वाढीसह ५७,५६६.९० वर उघडला. तर एनएसईचा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी ३९.२५ अंक किंवा ०.२३ टक्के वाढून १६,९८४.३० वर खुला झाला. मागील सत्रात सेन्सेक्स ३९८ अंकांनी घसरून ५७,५२७ वर, तर निफ्टी १३२ अंक घसरून १६,९४५ वर क्लोज झाला होता.

सेन्सेक्स आणि निफ्टीची आजची स्थितीआज बाजाराच्या सुरुवातीला मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक सेन्सेक्सच्या ३० पैकी केवळ ११ समभाग सुरुवातीच्या व्यापारात तेजीत व्यवहार करत असताना बँकिंग समभागांतील घसरण बाजाराला खाली खेचत आहे. सेन्सेक्समधील ३० पैकी १९ शेअर्समध्ये घसरण होत असताना याशिवाय निफ्टीच्या ५० पैकी २३ समभागांमध्ये तेजी तर २६ समभागांमध्ये घसरले आहेत. याशिवाय एका स्टॉकमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

बँकिंग शेअर्समध्ये पडझडआज सकाळच्या व्यवहार सत्रात बँकिंग शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे बाजारातील सुरुवातीची तेजी फुस्स झाली असून ही घसरण मार्केटला फारशी वाढ घेऊ देत नाहीत. अपोलो हॉस्पिटल्स, पॉवर ग्रिड, ओएनजीसी, हिंदाल्को आणि डिव्हिस लॅब निफ्टीच्या टॉप गेनर्स तर महिंद्रा अँड महिंद्रा, अदानी एंटरप्रायझेस, आयशर मोटर्स, टायटन आणि ॲक्सिस बँक हे टॉप लूसर्स ठरले. याशिवाय अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात संमिश्र कल दिसून येत आहे. अदानी पोर्ट, अदानी पॉवर, अदानी विल्मर, एसीसी, अंबुजा सिमेंट आणि अदानी एंटरप्रायझेसमध्ये घसरण होताना अदानी ग्रीन आणि एनडीटीव्हीमध्येही तेजीचा कल दिसत आहे.