सोलापूर-पूणे मार्गावर यावली येथे भीषण अपघात ४ जण ठार
अनगर वृत्तसेवा रांजणगाव ता. पारनेर जिल्हा अहमदनगर येथील महिला भाविक मारुती इको गाडीतून तुळजापूरला दर्शनासाठी चालले होते. या इको कारची यावली गावच्या परिसरात पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने भीषण धडक दिली. या अपघातात तीन महिला भाविक जागीच ठार झाल्या.

अनगर वृत्तसेवा रांजणगाव ता. पारनेर जिल्हा अहमदनगर येथील महिला भाविक मारुती इको गाडीतून तुळजापूरला दर्शनासाठी चालले होते. या इको कारची यावली गावच्या परिसरात पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूरकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने भीषण धडक दिली. या अपघातात तीन महिला भाविक जागीच ठार झाल्या. एका महिलेचा सोलापूर सिव्हिल रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या अपघातात चार महिला भाविक जखमी झाल्या आहेत.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज (बुधवार) दि.२३ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० वाजता मौजे मोहोळ हद्दीत, हॉटेल सरगम समोर पुण्याकडून सोलापूरकडे येणाऱ्या रोडने ईको कार क्र. एम.एच.४६ / ए.पी.४१२० हि सोलापूरच्या दिशेने जात होती. यावेळी समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनास धडक लागल्याने त्यात ईको कार मधील चालक १) आदमअली मुनावरअली शेख वय ३७ व बसलेले २) हिराबाई रामदास पवार वय ७५, ३) कमलाबाई मारूती वेताळ (वय ६०) रा. रांजनगाव मशीद ता. पारनेर हे गंभीर जखमी होवून जागीच ठार झाले. ४) द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय ४० रा. राजनगाव मशीद या सोलापूर सिव्हील हॉस्पीटल येथे उपचारास दाखल केल्यानंतर मृत झाल्या.
तसेच सदर ईको कार मधील १) बाळी बाबु पवार (वय २७) छकुली भिमा पवार (वय.२७) साई योगीराज पवार (वय ७ वर्ष) मंदाबाई नाथा पवार (वय ५२) सुरेखा भारत मोरे (वय ४५) बायजाबाई रामदास पवार (वय ६०) सर्व राहणार राजनगाव मशीद हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूर सिव्हील हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तरी मोहोळ पोलीस ठाण्यात टोलनाक्याचे पेट्रोलींग अधिकारी मलिकार्जुन बळीराम बजुलगे यांनी मोटार अपघाताची खबर दिली आहे.