दसरा मेळाव्यासाठी नेत्यांच्या मागे न जाता नारायण गडावर या:उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेत तयारीसाठी आंतरवालीत जाणार- मनोज जरांगे

नेत्याच्या मागे न जाता सर्व मराठा बांधवांनी नारायण गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे म्हटले आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील म्हणाले की, दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी मी उद्या रुग्णालयातून दुव्रपारी 12 वाजता डिस्चार्ज घेणार आहे. यानंतर ते दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी आंतरवाली सराटीमध्ये जाणार आहेत. नेते कुठे जातात लक्ष ठेवा मनोज जरांगे पाटील म्हणाले की, गावागावातील मराठ्यांनी आपल्या भागातील नेते कुठे आले कुठे गेले हे लक्षात ठेवायला हवे. उद्या ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीसाठी मतदान मागायला आपल्याकडे येणारच आहेत. कोण मुद्दामून नारायण गडावर आले नाही हे लक्षात घ्या असेही त्यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे. हे ही वृत्त वाचा मनोज जरांगेंना रसद पुरवणाऱ्या राजेश टोपे, रोहित पवारांसह 50 उमेदवारांना पाडणार
आम्ही आज रोजी 50 उमेदवार पडण्याची यादी तयार केली आहे. 50 उमेदवार कोणते पाडायचे हे आमचं ठरलं आहे. ज्यांनी मनोज जरांगे यांना मदत दिली, रसद पुरवली त्यांना आम्ही पडणार असल्याचे हाके म्हणाले. रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारखे उमेदवार आम्ही पाडणार आहोत, असे ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. दरम्यान लक्ष्मण हाके म्हणाले की, मुख्यमंत्री हे एका जातीचे मुख्यमंत्री नाहीत. ओबीसीची भूमिका घेणारे अनेक तरुण विधानसभेत दिसणार आहेत. ओबीसींनी यांच्या तुकड्यावर जगू नये 50 ते 60 टक्के लोकसंख्या असणाऱ्या ओबीसींची भीती शरद पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपला कधी बसेल? असा सवाल हाकेंनी बोलताना उपस्थित केला आहे.

Share

-