राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी जाहीर:सुनील तटकरे यांनी केली 4 नावे जाहीर, गेवराईतून विजयसिंह पंडित यांना उमेदवारी
राष्ट्रवादी काँग्रेसची तिसरी यादी आज जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चार उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. फलटणमधून सचिन पाटील, गेवराईतून विजयसिंह पंडित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दिलील बनकर यांना निफाडमधून संधी देण्यात आली आहे. तर पारनेरमधून काशिनाथ दाते उमेदवारी मिळाली आहे. दरम्यान नाशिकच्या निफाड पिंपळगाव मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीप काका बनकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. अहमदनगरचे खासदार नीलेश लंके यांच्या पत्नीविरोधातील उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. पारनेरमधून अजित पवार गटाने काशिनाथ दाते यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत.
पहिल्या यादीत 38 उमेदवार जाहीर राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी
बारामती- अजित पवार आंबेगाव- दिलीप वळसे पाटील अमरावती- सुलभा खोडके इंदापूर- दत्तात्रय भरणे पिंपरी- अण्णा बनसोडे पाथरी- निर्मला विटेकर मावळ – सुनील शेळके येवला- छगन भुजबळ कागल- हसन मुश्रीफ सिन्नर – माणिकराव कोकाटे श्रीवर्धन – अदिती तटकरे उदगीर- संजय बनसोडे अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले माजलगाव- प्रकाश सोळंखे वाई – मकरंद पाटील खेड आळंदी- दिलीप मोहिते पाटील अहमदनगर – संग्राम जगताप इंदापूर- दत्तात्रय भरणे अहमदपूर- बाबासाहेब पाटील कळवण- नितीन पवार कोपरगाव- आशुतोष काळे अकोले- किरण लहामटे वसमत – राजू नवघरे चिपळूण- शेखर निकम जुन्नर- अतुल बेनके मोहोळ- यशवंत माने हडपसर- चेतन तुपे देवळाली- सरोज अहिरे चंदगड- राजेश पाटील इगतपुरी – हिरामण खोसकर तुमसर- राजू कारेमोरे पुसद- इंद्रनील नाईक नवापूर- भरत गावित मुंब्रा कळवा- नजीब मुल्ला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यांदी देखील पहा…. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाल्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. एकीकडे सत्ताधारी पक्ष महायुती पुन्हा विजयाचा दावा करत आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्ष महाविकास आघाडी जास्त जागा जिंकून सत्तेत येईल, अशी आशा वक्त करत आहे.