News Image

चौधरी चौक ते विलास नगर रोडवर अतिक्रमण:मनपाने केली कारवाई


प्रतिनिधी । अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून शहरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे. हातगाड्या, टपऱ्या व रस्त्याच्या कडेला बसलेल्या विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात येत आहे. या कार्यवाहीत जवळ-जवळ ५० हातगाड्या जप्‍त करण्‍यात आल्या आहेत शहरातील अतिक्रमणांविरोधात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील अतिक्रमणांवर धडक कारवाईची मोहीम सुरू करण्याचे निर्देश आयुक्‍तांनी अतिक्रमण विभागाला दिले आहे. अतिक्रमण पथकाने हातगाड्या, टपऱ्या व तीनचाकी व चारचाकी वाहनांविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्याचप्रमाणे अनधिकृत फ्लेक्स जप्त करण्यात येत आहेत. यासोबत इतर प्रकारचे साहित्य जप्त करण्यात येत आहे. शहर अतिक्रमणमुक्त व्हावे यासाठी सहाय्यक आयुक्‍त नंदकिशोर तिखिले, सहाय्यक आयुक्‍त भुषण पुसतकर, अतिक्रमण पथक प्रमुख योगेश कोल्‍हे, श्‍याम चावरे, उपअभियंता प्रमोद इंगोले यांच्‍या नेतृत्‍वात पाच ट्रक व जेसीबी अतिक्रमण विभागाने चौधरी चौक ते विलास नगर रोडवर अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात हातगाड्या जप्‍त करण्‍यात आल्या. या कारवाईत ५० हातगाड्या जप्‍त करण्‍यात आल्या आहेत. अतिक्रमण काढताना मनपाचे पथक.