
चिंता:ब्रिटनच्या तुरुंगात इस्लामी गँगचा कब्जा; शरिया कायदा लागू, अधिकारी हतबल
ब्रिटनच्या हाय सिक्युरिटी तुरुंगात इस्लामिक कट्टरपंथी टोळ्यांचे वाढते वर्चस्व तुरुंग प्रशासन आणि सुरक्षा संस्थांसाठी गंभीर चिंतेचे कारण ठरले आहे. २०१७ च्या मँचेस्टर एरिना बॉम्बस्फोटातील दोषी हाशिम अबेदीने १२ एप्रिलला एचएमपी फ्रँकलँड तुरुंगात ३ तुरुंग अधिकाऱ्यांवर हल्ला केला. अबेदीने आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून गरम तेल आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्यात दोन अधिकारी जखमी झाले. या हल्ल्याने पुन्हा एकदा ब्रिटनच्या तुरुंगात बळकट होणाऱ्या कट्टरपंथी नेटवर्कवर प्रश्न उपस्थित होत आहे. लंडनचे वृत्तपत्र टेलिग्राफच्या एका वृत्तानुसार, फ्रँकलँड तुरुंग या वेळी इस्लामिक टोळ्यांच्या कब्जात आहे. तेथे कैद्यांवर दबाव टाकून किंवा धमकावून त्यांना आपल्या टोळीत सहभागी केले जात आहे. गेल्या दाेन दशकांत तुरुंगात टोळींच्या वर्चस्वात मोठा बदल झाला आहे. २००० च्या दशकात याची सुरुवात ९/११ सारख्या अतिरेकी हल्ल्यानंतर ब्रिटनमध्ये कट्टरपंथी कैद्यांच्या संख्येत अचानक वाढ झाली. २०१७ पर्यंत ब्रिटनच्या तुरुंगांत दहशतवादाशी संबंधित मुस्लिम कैद्यांची संख्या १८५ होती. २०२४ पर्यंत ही संख्या घटून १५७ झाली. मात्र, तरीही हा सर्व दहशतवादी कैद्यांचा ६२% हिस्सा आहे. निवृत्त जेल गव्हर्नर इयान एचसन यांनी सांगितले होते की, तुरुंग कट्टरपंथीयांसाठी भरती आणि ब्रेनवॉशचा अड्डा बनत आहेत. त्यांच्या अहवालानंतर धोकादायक अतिरेक्यंासाठी ‘सेपरेशन सेंटर’ बनवले. मात्र, समस्या अद्यापही गंभीर असल्याची स्थिती आहे. इशारा : कारवाई न केल्यास तुरुंग धोक्यांचा अड्डा हाेतील : तज्ज्ञ सुरक्षा तज्ज्ञांनुसार, तुरुंग प्रशासन नेहमीच त्यांची टीका दाबण्याचा प्रयत्न करते. अबेदीच्या हल्ल्याने पुन्हा सुरक्षा प्रश्न उभे केले आहेत. सुरक्षा तज्ञ इयान एचसन यांनी सांगितले की फ्रँकलँड एक मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या दिशेने जात होता. तुरुंग प्रशासनाचे दुर्लक्ष आता समोर आले आहे. ही समस्या सामान्य झाली आहे, ज्याला गंभीरतेने घेतले जात नाही. तज्ञांनुसार, जोपर्यंत जेलमध्ये कट्टरपंथी इस्लामी टोळी आणि फुटीरतावादाविरुद्ध कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत ब्रिटनच्या तुरुंगात असे धोके कायम राहतील. दबदबा: टोळ्या तुरुंगातून ड्रग्ज अन् ब्लॅकमनीचे रॅकेट चालवतात २०१९ च्या एका सरकारी अहवालात सांगितले की, काही तुरुंगात मुस्लिम ब्रदरहूड नावाने टोळी सक्रिय आहे. त्याचे संचालन लीडर, रिक्रुटर, एन्फोर्सर आणि फॉलोअर्सद्वारे होते. धर्माच्या नावावर या टोळ्यांनी शरीया न्यायालये स्थापन केली. तेथे ते अन्य कैद्यांवर ‘धार्मिक शिक्षा’ही देतात. ब्रिटनच्या तुरुंगात मुस्लिम कैद्यांची संख्याही वाढत आहे. २००२ मध्ये जिथे मुस्लिम कैद्यांची संख्या ५,५०० होती, तिथे २०२४ पर्यंत ही १६,००० झाली. यामुळे आता अनेक तुरुंगात मुस्लिम कैदी ब्रदरहूडच्या नावाने ग्रुप बनवून चालवतात. अनेक टोळ्या धर्माच्या नावावर हिंसाचार, तस्करी आणि धमक्यांचे काम करतात. माजी कैदी गॅरी म्हणाले, टोळ्यांचा दबदबा एवढा की, आता ते तुरुंग चालवतात. ड्रग्ज व पैशाची देवाण-घेवाण त्यांच्याद्वारे होते. अनेक कैद्यांना भीतीत टोळीचा हिस्सा व्हावे लागते. आणखी एक माजी कैदी रयानने म्हणाला, तो जेव्हा बेलमार्श तुरुंगात होता, तेव्हा दहशतवादी कैदी उर्वरित कैद्यांसाठी एखादा धर्म गुरूसारखे होते. नंतर हळूहळू सामान्य गुन्हेगारही त्यांच्या संपर्कात येऊन कट्टरपंथाचा मार्ग पकडू लागले. आव्हाने: आरोपांच्या भीतीने जेल स्टाफ टोळ्यांवर कारवाई टाळतो ब्रिटिश प्रिजन ऑफिसर्स असोसिएशनचे महासचिव स्टीव्ह गिलन म्हणाले, स्टाफ आरोपांच्या भीतीमुळे टोळ्यांवर कठोर कारवाई करू शकत नाही. आता परिस्थितीत काही बदल झाला आहे. प्रिजन गव्हर्नर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष मार्क इके यांनी मान्य केले की, “आता त्यांना चांगल्या प्रकारे मॅनेज करत आहोत.”अलीकडेच एका वकिलाने आरोप केला की फ्रँकलँड जेलमध्ये इस्लामिक गँगच्या विरोधात बोलणाऱ्या कैद्यांना स्वतंत्र ठेवावे लागले. मात्र, जेल प्रशासनाने हे आरोप ‘निराधार’ असल्याचे सांगितले.