
मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकात भीषण आग:अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, मोठ्या प्रमाणात धूर पसरला
मुंबईच्या चर्चगेट स्थानाकाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. येथील केकच्या दुकानाला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे स्थानकावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे समजत आहे. चर्चगेट स्टेशन हे वर्दळीचे स्थानक असून मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशा ठिकाणी आग लागल्याने एकच खळबळ उडाली. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थाळ गाठून आगीला आटोक्यात आणले आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये परिसरातून प्रचंड धूर निघत असल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे जवळच्या प्रवाशांना अस्वस्थता आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. तथापि, आतापर्यंत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. पाहा दृश्य ही बातमी आम्ही अपडेट करत आहोत