
ऐतिहासिक क्षण:चिनाब ब्रिज लष्कराला पाक-चीनशी लढण्याची पाचपट शक्ती देईल, आज जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावरून धावेल पहिली रेल्वे
जम्मू-काश्मीरमध्ये उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच आणि भव्य चिनाब रेल्वे ब्रिजचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी करतील. हा पूल २७२ किमी लांबीच्या उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या पुलामुळे पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवर (एलओसी) व चीनच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारतीय लष्कराला पोहोचण्यासाठी लागणारा वेळ ५ पटींनी कमी होईल. सध्या, ट्रेनने दोन्ही सीमांवर सैनिक आणि सामग्री पोहोचवण्यासाठी १६ तास लागतात, पण चिनाब ब्रिजमुळे हा वेळ घटून ३ तास होईल. यामुळे दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास हा पूल सैनिकांच्या तैनातीसाठी वरदान ठरेल. या पुलासोबतच २१५ किमी लांबीचा संपर्क रस्तादेखील तयार करण्यात आला आहे. यामुळे दोन्ही सीमांवरील ७० गावांना रस्ते संपर्क मिळाला आहे, ज्यांना भारतीय लष्कराचे ‘डोळे आणि कान’ मानले जाते. जम्मू विभागातील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीच्या दोन किनाऱ्यांना २९ हजार टन स्टील आणि ६७ हजार घनमीटर काँक्रीट वापरून जोडले. या पुलामुळे अत्यंत दुर्गम व बर्फवृष्टीमुळे अवघड मानल्या जाणाऱ्या भागांत चोवीस तास वाहतूक शक्य होईल पहिली ट्रेन स. ८.१० वाजता पहिली ट्रेन कटरातून स. ८:१० ला सुटेल व सकाळी ११:०८ वाजता श्रीनगरला पोहोचेल. श्रीनगर येथून दु. २:०० वाजता सुटेल व सायंकाळी ४:५८ वाजता कटरा येथे परत येईल. (मंगळवारी बंद) दुसरी ट्रेन कटरातून दु. २:५५ वाजता सुटून सायं ५:५३ वा. श्रीनगरला पोहोचेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ८:०० वाजता श्रीनगरहून सुटेल. (बुधवारी बंद) कटरा-श्रीनगर मार्गावर धावतील २ ट्रेन्स, २ श्रेणीचे डबे; भाडे ७१५ ते १३२० रुपये श्रीनगर। पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी कटरा-श्रीनगर रेल्वे प्रकल्प सुरू करतील. या मार्गावर दोन वंदे भारत एक्स्प्रेस धावतील. या गाड्या रोज चार फेऱ्या मारतील आणि त्यांचे व्यावसायिक संचालन ७ जूनपासून सुरू होईल. आठवड्यातून ६ दिवस या गाड्या धावतील. यात २ कोच असतील. चेअर कारचे भाडे ७१५ रुपये व एक्झिक्युटिव्ह क्लास (ईसी) चे भाडे प्रति प्रवासी १३२० रुपये असेल. २ हजार कामगार, ३०० अभियंते; स्वदेशी स्टीलद्वारे निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करतील. हा माझ्यासाठी केवळ एक समारंभ नाही, तर गेल्या दशकात या प्रकल्पाच्या प्रत्येक इंचावर लावलेल्या रणनीती आणि अचूक अभियांत्रिकीचा हा परिणाम आहे. आम्ही ३५९ मीटर उंच चिनाब पूल २८ हजार मेट्रिक टन स्वदेशी स्टील वापरून उभा केला आहे. दोन हजार कामगार आणि ३०० अभियंत्यांच्या टीमने स्वतः वीज निर्माण करून, पाण्याची पाइपलाइन टाकली.हा पूल सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याच्या पायाची प्रूफिंग ब्रिटिश फर्म यूआरएस ने केली, तर वायाडक्ट आणि आर्चची प्रूफिंग कोवी या कंपनीने केली. भूकंपात त्याची स्थिरता तपासण्याचे विश्लेषण आयटीएएसकेए आणि आयआयटी दिल्ली यांनी केले.पुलामध्ये वापरलेले प्रत्येक साहित्य स्वदेशी आहे. हा प्रकल्प आधी २००९ पर्यंत पूर्ण होणार होता, परंतु सुरक्षा चिंता आणि डिझाइनमधील बदलांमुळे २००८ मध्ये तो थांबवण्यात आला. पीओकेला लागून असलेल्या एलओसीपासून ६० किमी दूर असलेला हा पूल दहशतवाद्यांच्या कुटिल हेतूंना लक्षात घेऊन स्फोट-प्रतिरोधक बनवण्यात आला आहे. डीआरडीओच्या तांत्रिक सहकार्याने तयार केलेला हा पूल ४० टन टीएनटी स्फोटाला सहजपणे सहन करू शकतो.रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मते, १.३ किमी लांबीचा चिनाब ब्रिज नदीच्या तळापासून ३५९ मीटर उंचीवर आहे. हा पूल पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षाही ३५ मीटर उंच आहे. तसेच, हा कटरा ते बनिहालपर्यंतच्या १११ किमी लांबीच्या मार्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे.