News Image

3 वर्षांच्या चिमूकल्याने केली उदयनराजेंच्या स्टाईलची कॉपी:कॉलर उडवत करून दाखवली नक्कल, उदयनराजे भोसलेंनी कौतुकाने जोडले हात


साताऱ्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खासदार उदयनराजे भोसले यांचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. त्यांची अनोखी स्टाईल, सडेतोड राजकीय भूमिका आणि लोकांशी मनमोकळा संवाद या सगळ्यामुळे ते कायम चर्चेत राहतात. अगदी थोरांपासून लहानांपर्यंत अनेकांना ते आपलेसे वाटतात. असाच एक किस्सा साताऱ्यातील पंकज चव्हाण यांच्या तीन वर्षांच्या चिरंजीव ओजसचा समोर आला आहे. उदयनराजे प्रत्यक्ष त्याच्या समोर आले तेव्हा, ओजसने त्यांच्या स्टाईलची हुबेहूब नक्कल करत कॉलर उडवली. उदयनराजे जसे 'पुष्पा'च्या डायलॉगवर आपल्या गालावरून हात फिरवतात तसे हातवारे केल्यामुळे उदयनराजे देखील आवाक झाले आणि त्याच्यासमोर त्यांनी हात जोडले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यानंतर या चिमुकल्याने उदयनराजेंना ड्रायफ्रूट खायला दिले. त्यावर उदयनराजेंनी ते आपुलकीने स्वीकारत स्वतःच्या खिशात भरले. यावरून लहान मुलांबद्दल त्यांचा प्रेमळ स्वभाव अधोरेखित झाला. सध्या ओजस आणि उदयनराजेंच्या या हृद्य भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक जण या लहानग्याच्या अदा आणि उदयनराजेंच्या प्रतिसादावर प्रेम करत आहेत. राजकीय वर्तुळातील हा हटके क्षण लोकांच्या मनाला भिडत आहे. नेहमीच आपल्या हटके अंदाजासाठी चर्चेत असणारे खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या खास 'कॉलर उडवण्याच्या' स्टाईलमुळे कायमच चाहत्यांच्या गळ्यातली ताईत ठरले आहेत. त्यांच्या या स्टाईलचा प्रभाव इतका आहे की, एकदा खुद्द शरद पवारांनीही एका सभेत उदयनराजेंसारखी कॉलर उडवून दाखवली होती. साताऱ्यातील तीन वर्षांचा चिमुकला ओजस हा उदयनराजेंचा मोठा चाहता असून, राजेंना समोर पाहताच त्यानेही त्यांच्या शैलीतच कॉलर उडवत हटके अदा केली. त्याच्या या अंदाजावर खुद्द उदयनराजेही भारावले गेले आणि त्यांनी ओजससमोर आदराने हात जोडले. यानंतर ओजसने त्यांना प्रेमाने ड्रायफ्रूटही दिले, जे राजेंनी स्वतःच्या खिशात भरले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय, आणि पुन्हा एकदा राजेंच्या लोकाभिमुख आणि दिलदार स्वभावाची झलक लोकांना पाहायला मिळते आहे.