
बाधित शेतकऱ्यांना 50% रक्कम वितरित:बाजार समितीकडून 90 लाखांचे शेतकऱ्यांना धनादेश वाटप
पणनमंत्री जयकुमार रावल यांच्या निर्देशानुसार व्यापाऱ्यांनी फसवणूक केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सहकार विभागाचे कलम ५७ तीन या वसूलही कारवाईला अधीन राहून बाजार समिती व्यवस्थापनाने शेतकऱ्यांना सेस फंडातून ५० टक्के नुकसान भरपाईचे धनादेश शनिवारी वाटप करण्यात आले. बाजार समितीच्या आवारात फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीच्या तिजोरीतून नुकसान भरपाईचा मोबदला देण्याची भूमिका घेणारी बाजार समिती पहिली बाजार समिती ठरली आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळवून देण्यासाठी आ. बोरनारे यांनी पाठपुरावा केल्याबद्दल पेढे वाटून फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. सभापती रामहरी जाधव, संचालक अविनाश गलांडे, देवदास वाणी, कल्याण जगताप, गणेश इंगळे, प्रवीण पवार, प्रशांत त्रिभुवन, सचिव प्रल्हाद मोटे, उपसचिव संदीप निकम, लेखापाल दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत २७० शेतकऱ्यांना ९० लाखांचे धनादेश वाटप करण्यात आले. व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टांचा मोबदला मिळवून देण्यासाठी आ. बोरनारे यांनी पाठपुरावा केल्याबद्दल आभार मानले. व्यापारी सागर राजपूत यांनी दोन कोटी पाच लाख रुपये किमतीचा कांदा खरेदी करुन ४०० शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. बाजार समितीने व्यापाऱ्यांचा दुकान गाळा लिलावात काढून तसेच दोन आमदारांकडून ३१ लाखाची रक्कम वसूलही करुन १११ शेतकऱ्यांना वाटप केली होती. व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टांचा मोबदला मिळवून देण्यासाठी आ. रमेश बोरनारे यांनी पाठपुरावा केल्याबद्दल शेतकरी गणेश तांबे, दत्ता गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानले. काही होते प्रकरण