News Image

दिवा ते कळवा डेंजर झोन:मुंब्रा रेल्वे अपघातातल्या प्रत्यक्षदर्शींने वाचला भीषण अनुभवांचा पाढा; म्हणाला - दर महिन्याला घडतात दुर्घटना


मुंबईतील मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज (9 जून) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. दोन लोकल गाड्या एकमेकांजवळून जाताना लटकलेले प्रवासी घासले गेले. मुंब्रा रेल्वे स्थानकावर आज सकाळी सुमारे 13 प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हे प्रवासी ट्रेनच्या गेटवर बसले होते, जिथून ते खाली पडले. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना लोकल ट्रेनची आहे. सकाळच्या वेळेत प्रचंड गर्दीमुळे हा अपघात झाला. हा अपघात झाला त्यामागे काही कारणे आहेत, याबद्दल मुंब्रा येथील एका स्थानिकाने माहिती दिली आहे. माध्यमांशी बोलताना त्याने सांगितले की, माझे नाव रफीक, मुंब्रा प्रवासी संघ हे आमच्या कम्यूनिटीचे फोरम आहे. आज झालेली दुर्घटना ही काही पहिली नाही. दर महिन्यात असे अपघात होत असतात. दिवा पासून ते कळवा या दरम्यान अशा दुर्घटना घडताना दिसून येतात. दिवा येथे लोकलमध्ये जी झडप होत असते तेव्हा ही दुर्घटना घडल्याचे समजते. इथून जो टर्न घेतला जातो यावेळी लोकलच्या दरवाजात उभे असणाऱ्या लोकांना जरा सुद्धा जरी धक्का बसला तरी ते दरवाजाच्या बाहेर फेकले जाऊ शकतात. वळणावर झटका बसतो पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, दिवा ते कळवा हा पूर्ण डेंजर झोन आहे. दर महिन्यात या मार्गात 4-5 अपघात होतात. आपण जेव्हा या मार्गातून प्रवास करू तेव्हा आपल्याला समजेल की इथे असलेल्या वळणावरून लोकल जाताना एक झटका बसतो आणि त्या झटक्यामुळे लोकलमधील प्रवासी आपोआप दुसऱ्या बाजूला झुकले जातात. या वळणावर कुठलेच सेफ्टी पॅरामिटर्स नाहीयेत. याकडे सेंट्रल रेल्वेने लक्ष दिले पाहिजे. मुंब्रा स्टेशनवर फास्ट लोकल थांबत नसल्याने प्रवसी इथून कळवाला जातात किंवा दिवाला जातात, अशी माहिती त्यांनी दिली आहे. स्पीड वाढली की कंट्रोल सुटतो तसेच आणखी एका प्रवाशाने माध्यमांशी संवाद साधला असून, त्याने सांगितले की, हा ट्रॅक इतका वाईट आहे, तिथे ट्रेन स्पीड पकडते तेव्हा प्रवाशांचा हाताचा देखील कंट्रोल सुटतो. प्रशासनाला वाटले नाही की कसरा ट्रेनचा जो थांबा आहे, या लोकांनी दिवा, मुंब्रा या बाजूला दिला आहे. परंतु या लोकांना असे वाटले नाही की कल्याण ट्रेनला होल्ड द्यावी. लांब पल्ल्याच्या ज्या ट्रेन आहेत, खोपोली आहे, कर्जत आहे, कसारा आहे, या ट्रेनला छोट्या छोट्या स्थानाकांना होल्ड दिले आहेत. त्यामुळे कसारा, खोपोली आणि कर्जतला प्रेशर येतो आणि हे होणार. प्रशासनाने याकडे लक्ष नाही दिले तर असे अपघात होत राहणार, असे या प्रवाशाने म्हटले आहे. एक प्रवासी उडत आला आणि तिघांना घेऊन गेला आणखी एका प्रवाशाने अपघाताची भयावह घटना सांगितली आहे. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आम्ही भिवंडीत वास्तव्यास आहोत. आम्ही चार लोक लोकलमधून प्रवास करत कामावर जात होतो. आमचा एक मित्र अपघातात ट्रॅकवर पडला. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आमच्या आधीच्या डब्यातून एक प्रवासी उडत आला आणि आमच्या डब्यातून तीन लोकांना घेऊन गेला. त्यानंतर मागील डब्यातून देखील लोक खाली रेल्वे ट्रॅकवर पडले. डब्यातील काही लोक देखील जखमी झाले आहेत. अपघातानंतर आम्ही ठाणे स्टेशनवर उतरलो आणि दुसरी लोकल पकडून इकडे हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहोत, अशी माहिती त्याने दिली आहे. ठाण्यात ट्रेनमधून 13 प्रवासी पडले, 6 जणांचा मृत्यू:सर्वजण ट्रेनच्या गेटवर बसले होते, गर्दी जास्त असल्याने अपघात ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर आज सकाळी सुमारे 13 प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हे प्रवासी ट्रेनच्या गेटवर बसले होते, जिथून ते खाली पडले. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना लोकल ट्रेनची आहे. सकाळच्या वेळेत प्रचंड गर्दीमुळे हा अपघात झाला. वाचा सविस्तर