News Image

ठाण्यात ट्रेनमधून 13 प्रवासी पडले, 4 जणांचा मृत्यू:रेल्वे कोट्यवधी जनतेच्या आयुष्याचा कणा, पण आज अव्यवस्थेचे प्रतीक -राहुल गांधी


ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर आज सकाळी काही प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यापैकी काही जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हे प्रवासी ट्रेनच्या दरवाज्याला लटकलेले होते, जिथून ते खाली पडले. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना लोकल ट्रेनची आहे. सकाळच्या वेळेत प्रचंड गर्दीमुळे हा अपघात झाला. मात्र, या घटनेत किती प्रवासी जखमी आहेत आणि किती जणांचा मृत्यू झाला? या बाबत प्रशासन अद्याप माहिती देऊ शकलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत 13 प्रवासी पडले, 9 प्रवासी जखमी तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता. मृतांच्या कुटूंबीयांना 5 लाख रुपये जाहीर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्या असून अपघातात ज्या 4 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटूंबीयांना मदत म्हणून आम्ही 5 लाख रुपये जाहीर केले आहेत. याशिवाय जखमींना 50 हजार, एक लाख किंवा दोन लाख रुपये दिले जातील. तसेच त्यांचा सर्व उपचार शासनाच्या माध्यमातून केला जाईल. याशिवाय ज्युपिटरला जे दोन रुग्ण गंभीर आहेत, त्यांचा सर्व खर्च शासन करेल, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे.