News Image

स्वप्नातील घर घ्यायला बाहेर पडला, अन् काळाने घाला घातला:मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत ठाण्याच्या IT इंजिनिअरचा दुर्दैवी अंत, घरात होता एकुलता एक


मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या रेल्वे अपघातात लोकल ट्रेनमधून खाली पडून चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, तर 9 जण जखमी झाले. मृतांमध्ये ठाण्यातील 44 वर्षीय आयटी इंजिनिअर मयूर शाह यांचा समावेश आहे. मयूर शाह यांचे डोंबिवलीत घर घेण्याचे स्पप्न होते. त्यासाठी ते आज डोंबिवलीला निघाले होते. परंतु, त्यांचा हात घसरला आणि रेल्वेतून खाली पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळे काही प्रवासी लटकून प्रवास करत होते. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आल्यानंतर सीएसएमटीवरून आलेली दुसरी लोकल प्रवाशांना घासल्यामुळे दरवाज्याजवळ उभे असलेले 13 प्रवासी खाली पडले. त्यातील चार जणांना आपला जीव गमवावा लागला. घरात होता एकुलता एक या दुर्घटनेतील मृतांमध्ये ठाण्याच्या घोडबंदर रोड परिसरात राहणाऱ्या मयूर शाह (वय ४४) या आयटी क्षेत्रातील अभियंत्याचाही समावेश आहे. मयूर विद्याविहार येथील एका खाजगी कंपनीत कार्यरत होते. तो अविवाहित असून आईसोबत राहत होता त्यांना दोन बहिणी आहेत. बहिणींचे लग्न झाले असून मयूर स्वतः अविवाहित होते. घर घेण्यासाठी डोंबिवलीला जात होता मयूर शाह यांची डोंबिवलीत घर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्याच दरम्यान घर विकणाऱ्या व्यक्तीला भेटण्यासाठी ते डोंबिवलीला निघाले असावेत, असा अंदाज त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. प्रवासादरम्यानच रेल्वेच्या दरवाज्याजवळ उभे असताना त्यांचा हात निसटल्याने ते खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांचे २२ वर्षांपूर्वीच निधन या प्रकरणी मयूर शाहच्या मेहूण्यांनी, संतोष दोशी यांनी माहिती देताना सांगितले की, "मयूर हा ठाण्यामध्ये त्याच्या आईसोबत राहायचा. त्याचे वडील हे २२ वर्षांपूर्वीच वारले. तो विद्याविहारला कामाला होता. त्याला डोंबिवलीत घर घ्यायचं असल्याने तो कधीकधी घराच्या मालकाला डोंबिवलीत भेटायला जायचा. आताही सकाळी तो त्यासाठीच गेला असेल आणि त्या दरम्यान हा अपघात झाला. पोलिसांनी आम्हाला या दुर्घटनेची माहिती दिली." दुर्घटनेतील मृतांची नावे राहुल संतोष गुप्ता (२८) रा. दिवा
सरोज केतन (२३) रा. उल्हासनगर
मयूर शाह (४४) जखमी व्यक्तींची माहिती
1. शिवा गवळी (पुरुष २३ वर्ष/यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
2. आदेश भोईर (पु/26 वर्ष, राहणार: आढगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
3. रिहान शेख (पु/२६ वर्ष, राहणार: भिवंडी, प्रवास: कल्याण ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
4. अनिल मोरे (पुरुष ४० वर्ष, यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)
5. तुषार भगत (पु/२२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)
6. मनीष सरोज (पु/२६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
7. मच्छिंद्र गोतारणे (पु/३९ वर्ष, राहणार: वाशिंद, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
8. स्नेहा धोंडे (स्त्री/२१वर्ष, राहणार: टिटवाळा, प्रवास: टिटवाळा ते ठाणे यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)
9. प्रियंका भाटिया (स्त्री/२६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)