News Image

रेल्वे दुघर्टनेची जबाबदारी रेल्वे प्रशासनाचीच:त्यांना ही जबाबदारी टाळता येणार नाही, अजित पवारांनी सुनावले खडेबोल


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई लोकल अपघाताची जबाबदारी रेल्वे असून, त्यांना ती टाळता येणार नाही असे परखड मत व्यक्त केले आहे. मुंब्रा येथे झालेल्या फास्ट लोकल दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. या अपघाताला प्रवाशी जबाबदार असल्याचा दावा रेल्वेने केला होता. पण अजित पवारांनी त्यांचा हा दावा धुडकावून लावत रेल्वे प्रशासनाला या अपघाताची जबाबदारी टाळता येणार नाही, असे ठणकावले आहे. अजित पवार पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवासी पडल्याची माहिती सुरुवातीला सांगितली जात हाेती. परंतु तसा काेणता प्रकार घडला नाही. साेमवारी सकाळी साडेनऊ वाजता दाेन ट्रेन रुळावरुन जात असताना मुंब्रा ते दिवा दरम्यान प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना लागल्या. त्यामुळे प्रवाशी खाली पडले. या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वेची आहे. ती ते टाळू शकणार नाही. याबाबत चाैकशीअंती वस्तुस्थिती पुढे येईल. तूर्त काेणत्या राजकीय नेत्यांना काय बाेलायचे हा त्यांचा अधिकार आहे. चाैकशी केल्यावर ज्या गाेष्टी समाेर येतील त्याबाबत खबरदारी घेण्याचे सक्त सूचना सबंधितांना दिल्या जातील. अजित पवार म्हणाले, मुंबईत लाेकांची ये-जा करण्यासाठी रेल्वे एक महत्वाचे साधन आहे. रेल्वे प्रशासनामार्फत अनेक उपाययाेजना केल्या जात आहे. ब्रिटिश काळातील पूल काढून नवीन पुल बसवले गेले आहेत. माेठ्या प्रमाणात लाेक रेल्वे स्थानकावर येत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही रेल्वेमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. लाेकलला दरवाजे केले तर ते कितपत लागू हाेतील सांगता येत नाही. कारण प्रवाशांची कमी वेळेत चढ- उतार हाेत असते. झालेली घटना दुर्देवी असून मनाला वेदना देणारी आहे. अशाप्रकारे घटना घडल्यावर रेल्वे विभागा तर्फे मयत व जखमी यांना रेल्वे प्रशासनाकडून तातडीने मदत दिली जाते. रेल्वेचे डबे वाढवले तरी त्या प्रमाणात स्थानकाचे प्लॅटफाॅर्म देखील वाढले पाहिजे. मेट्राे ही देखील सार्वजनिक व्यवस्था असून त्याला गती देण्याचे काम केले जात आहे. चर्चगेटकडे येणारा माेठा प्रवासी गट असून त्यांची सुरक्षा महत्वाची आहे, असे ते म्हणाले. अजित पवार यांनी मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेच्या सद्यस्थितीवरही भाष्य केले. लोकल ट्रेन दोन-तीन मिनिटांनी सुटते. डबे वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेट्रोच्या गतीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. काही ठिकाणी बसेसची व्यवस्थाही करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत. या दुर्घटनेबाबत चौकशी सुरू असून, त्यातून समोर येणाऱ्या प्रत्येक बाबीवर कठोर कारवाई केली जाईल, असे पवार यांनी आश्वासन दिले.