
अजब समस्या:सौर ऊर्जेचा पुरवठा कधी तरी प्रचंड वाढतो, विनिमय किंमत शून्यावर, निर्मिती प्रकल्प बंद करावे लागतात
गेल्या महिन्यात देशाच्या वीज क्षेत्रात एक अनोखी घटना घडली. २५ मे रोजी सकाळी ९.३० ते ९.४५ दरम्यान इंडियन एनर्जी एक्सचेंज (आयईएक्स) वर सौर ऊर्जेची रिअल-टाइम मार्केट (आरटीएम) क्लिअरिंग किंमत शून्यावर आली. याचा अर्थ असा की, ज्याने बाजारातून सौर ऊर्जा खरेदी केली त्याला फक्त ट्रान्समिशन व ओपन अॅक्सेस शुल्क भरावे लागले. शून्य किंमत फक्त १५ मिनिटांसाठी टिकली असली तरी या घटनेने देशात ऊर्जा साठवणूक परिसंस्थेची किती आवश्यकता आहे हे दर्शवले. त्याच्या अनुपस्थितीत कधी कधी सौर ऊर्जेचे उत्पादन थांबवता येत नाही म्हणून विजेचा रिअल-टाइम पुरवठा कधी कधी प्रचंड वाढतो. यामुळे किमतींमध्ये मोठी घसरण होत आहे.
मेमध्ये एक्सचेंजवर वीज खरेदी-विक्री ४२% वाढली, दर २८% घटले आयईएक्सचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक रोहित बजाज यांच्या मते, सौर ऊर्जेसह जलविद्युत, पवन व कोळशापासून वीजनिर्मितीही वाढली आहे. यामुळे एक्सचेंज प्लॅटफॉर्मवरील पुरवठा वाढला. उदा. मे महिन्यात एक्सचेंजवर विजेची खरेदी-विक्री ४.७७ अब्ज युनिट्सवर गेली. हे वार्षिक ४२% जास्त आहे. परिणामी, डे-अहेड मार्केट (डीएम) व आरटीएम दोन्हीत किमती कमी झाल्या. गरजेहून अधिक वीज ग्रिडमध्ये टाकल्याने हाय फ्रिक्वेन्सीची स्थिती