टी-२० वर्ल्डकप: संघ निवडीसाठी फक्त १५ दिवस शिल्लक, असा आहे भारताचा संभाव्य संघ

नवी दिल्ली:भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया कपमध्ये खेळत आहे. टीम इंडियाने स्पर्धेच्या सुपर- ४ मध्ये स्थान मिळवले आहे. मात्र संघाची नजर ही आगामी टी-२० वर्ल्डकप (T20 World Cup)वर आहे. या वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकप होणार आहे. यासाठी संघ जाहीर करण्यासाठी आता फक्त १५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळेच प्रत्येकाची नजर भारतीय संघावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आधीच जाहीर केले होते की टी-२० वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या बोर्डांना १५ सप्टेंबरपर्यंत संघ जाहीर करावे लागतील. या वर्ल्डकपचे आयोजक ऑस्ट्रेलिया आहे आणि त्यांनी देखील संघाची घोषणा केली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्डकपची जोरदार तयारी करत आहे. अशाच सर्वांना उत्सुकता लागली आहे की वर्ल्डकपच्या संघात कोणाला संधी मिळते. भारतीय संघाचा स्क्वॉड पाहिला तर अधिक तर खेळाडूंची निवड पक्की झाली आहे. फक्त २-३ खेळाडूंवर चर्चा सुरू आहे. किंवा निवड समिती एखादा धक्का देखील देऊ शकते.

कसा असेल टी-२० वर्ल्डकपसाठीचा भारतीय संघ (India Probable Playing Xi T20 World Cup)

१) रोहित शर्मा (कर्णधार)
२) केएल राहुल (उप-कर्णधार)
३) विराट कोहली
४) सूर्यकुमार यादव
५) ऋषभ पंत
६) दिनेश कार्तिक
७) हार्दिक पंड्या
८) रविंद्र जडेजा
९) भुवनेश्वर कुमार
१०) जसप्रीत बुमराह
११) हर्षल पटेल
१२) युजवेंद्र चहल
१३) आर अश्विन
१४) अर्शदीप सिंह
१५) दीपक हुड्डा

अर्थात या १५ खेळाडूंचे स्थान निश्चित आहे असे नाही. असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्यांचा विचार देखील केला जाऊ शकतो. यात श्रेयस अय्यर, आवेश खान, उमरान मलिक, दीपक चहर, रवि बिश्नोई, ईशान किशन यांचा समावेश होतो. आता यापैकी वर्ल्डकप संघात कोणाला स्थान मिळेल का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कधी सुरू होणार वर्ल्डकप (When T20 World Cup start)

टी-२० वर्ल्डकपची सुरूवात १६ ऑक्टोबरपासून होणार आहे. १३ नोव्हेंबर रोजी फायनल मॅच असेल. या स्पर्धेत १६ संघ आहेत. ऑस्ट्रेलियातील ७ वेगवेगळ्या शहरात सामने होतील. भारतला ग्रुप-२ मध्ये ठेवण्यात आले आहे. या ग्रुपमध्ये पाकिस्तान, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका देखील आहेत.

भारताच्या लढती (India’s match IN T20 world cup)

२३ ऑक्टोबर-भारत विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न
२७ ऑक्टोबर- भारत विरुद्ध ग्रुप ए रनर अप, सिडनी
३० ऑक्टोबर- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ
२ नोव्हेंबर- भारत विरुद्ध बांगलादेश, एडिलेड
०६ नोव्हेंबर- भारत विरुद्ध ग्रुप बी विजेता, मेलबर्न

Leave a Comment

Your email address will not be published.