मोदींनी जो बायडेन यांच्याशी फोनवर केली चर्चा:युक्रेन-बांगलादेश मुद्द्यावर चर्चा, शांततेसाठी भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी, २६ ऑगस्ट रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी युक्रेनसह विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी युक्रेनमधील शांतता आणि स्थैर्यासाठी भारताच्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. मोदी आणि बायडेन यांच्यात बांगलादेशच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. बांगलादेशातील परिस्थिती लवकरच सामान्य करण्यावर मोदी आणि बायडेन यांनी भर दिला. बांगलादेशातील कायदा व सुव्यवस्था लवकरात लवकर पूर्ववत...