मिचेल सँटनरला प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकन मिळाले:पुणे कसोटीत 13 विकेट्स घेत भारताकडून हिसकावला विजय; रबाडा-नोमानही शर्यतीत
न्यूझीलंडचा डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरला ऑक्टोबर महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूसाठी नामांकन मिळाले आहे. पुणे कसोटीत त्याने भारताविरुद्ध दोन्ही डावात मिळून 13 विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने दुसरी कसोटी आणि मालिका जिंकली. सँटनरसोबतच पाकिस्तानचा डावखुरा फिरकी गोलंदाज नोमान अली आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा हेही पुरस्कार जिंकण्याच्या शर्यतीत आहेत. रबाडाने बांगलादेशविरुद्ध तर नोमानने इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी केली. सँटनर...