जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्याची मागणी, 4 दिवसांचा अल्टिमेटम:कॅनडात 24 खासदार पंतप्रधानांच्या विरोधात, राजीनामा न दिल्यास बंड करण्याचा इशारा
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना त्यांच्याच पक्षातून विरोध होत आहे. उदारमतवादी पक्षाच्या खासदारांनी ट्रुडो यांना पंतप्रधानपदावरून पायउतार होण्यासाठी 28 ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. संतप्त नेत्यांनी ट्रुडो यांना एकतर पायउतार व्हा किंवा बंडखोरीला सामोरे जाण्यास तयार राहा असे सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रुडो यांच्या पक्षाच्या 24 खासदारांनी निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांना हटवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी मागणी पत्रावर स्वाक्षरीही केली आहे. खासदारांच्या स्वाक्षरी...