पाकच्या पंजाबमध्ये 3 हिंदूंचे अपहरण:डाकू म्हणाले- साथीदारांना सोडा नाहीतर जीवे मारू, खैबर-पख्तूनख्वामध्ये 16 मजुरांचेही अपहरण
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून तीन हिंदू तरुणांचे अपहरण करण्यात आले आहे. अपहरण करणाऱ्या गुन्हेगारांनी आपल्या साथीदारांची सुटका करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे. तसेच, तसे न केल्यास अपहरण केलेल्या हिंदूंना ठार मारण्याची धमकी दिली आहे. पंजाब पोलिसांनी गुरुवारी सांगितले की, बुधवारी ही घटना रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग भागात घडली. हा परिसर पंजाबची राजधानी लाहोरपासून 400 किमी अंतरावर आहे. शमन, शमीर आणि...