धनगरांची लोकसंख्या एक काेटीवर, तरी केवळ 1 आमदार:72 ते 75 मतदारसंघांमध्ये विखुरला आहे समाज, यंदा फक्त9 जण निवडणूक रिंगणात
मराठा समाजानंतर राज्यात दुसऱ्या क्रमांकाची तब्बल १.०५ कोटी लोकसंख्या धनगर समाजाची आहे. राज्याच्या लोकसंख्येचा ८-९% हिस्सा असणारा हा समाज प्रामुख्याने १७ ते १८ जिल्ह्यांतील ७२ ते ७५ मतदारसंघात विखुरलेला आहे. २०१४ च्या विधानसभेत धनगर समाजाचे ५, तर २०१९ मध्ये केवळ १ आमदार राहिला. यंदा निवडणुकीच्या तोंडावर धनगरांनी आरक्षणासाठी आंदोलन केले. मात्र, महायुती किंवा मविआने त्याची फारशी दखल न घेता धनगर...