अमेरिकेत हेलेन चक्रीवादळाचा कहर, 225 जणांचा मृत्यू:225kmph च्या वेगाने पुढे जात आहे; 12 राज्यांतील 1.20 कोटी लोकांना फटका, 1000 उड्डाणे रद्द

अमेरिकेत शुक्रवारी हेलेन चक्रीवादळामुळे 12 राज्यांत 225 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. 1 कोटी 20 लाख लोकांना याचा फटका बसला आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, दक्षिण कॅरोलिना, व्हर्जिनिया आणि अलाबामा येथे आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. या राज्यांमध्ये 1000 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 4 हजारांहून अधिक उड्डाणांना फटका बसला आहे. हेलेन चक्रीवादळ...

अलविदा रतन टाटा:एकेकाळी रिलेशनशिपमध्ये असलेल्या सिमी ग्रेवालनी लिहिले- गुडबाय फ्रेंड, कमल हसन म्हणाला- ते माझे हिरो होते

टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी बुधवारी, 9 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पीएम नरेंद्र मोदी, सलमान खान, कमल हासन आणि राजामौली यांच्यासह अनेक चित्रपट सेलिब्रिटींनीही रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. एकेकाळी रतन टाटांसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून उद्योगपतीची आठवण...

रतन टाटांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिलजीतने कॉन्सर्ट थांबवला:म्हणाला- आपण त्यांच्याकडून कठोर परिश्रम आणि चांगले विचार करायला शिकले पाहिजे

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीज दोसांझ सध्या म्यूझिक वर्ल्ड कॉन्सर्ट टूरवर आहे. काल रात्री तो जर्मनीत एक कॉन्सर्ट करत होता. दरम्यान, उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाची बातमी समजताच त्याने आपला परफॉर्मन्स अर्ध्यावरच थांबवला. दिलजीतने मंचावरूनच टाटांना श्रद्धांजली वाहिली. ते कधीही कोणाबद्दल वाईट बोलले नाही: दिलजीत गायक म्हणाला- ‘तुम्ही सगळे रतन टाटाजींना ओळखता. आज त्यांचे निधन झाले. मला रतन टाटा यांना...

हिजबुल्लाह चीफ नसराल्लाहचा उत्तराधिकारी सैफिद्दीनचा मृत्यू:गेल्या आठवड्यात हवाई हल्ल्यात ठार, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी दिली माहिती

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाहचा उत्तराधिकारी हाशेम सैफिद्दीन याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. टाइम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, गेल्या आठवड्यात गुरुवारी बैरूतमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात सैफिद्दीन मारला गेला. नेतन्याहूंपूर्वी संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनीही काल संध्याकाळी त्याच्या मृत्यूचा दावा केला होता. 27 सप्टेंबर रोजी इस्रायली हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख नसराल्लाह मारला गेल्यानंतर, सैफिद्दीनला प्रमुखासाठी प्रमुख दावेदार मानले जात...

दक्षिण कोरियाच्या हान कांग यांना साहित्याचे नोबेल:जीवनातील मार्मिक कथा सुंदर शैलीत सादर केल्याबद्दल सन्मान

2024 सालचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा दक्षिण कोरियाच्या हान कांगला हे पारितोषिक मिळाले आहे. जीवनातील मार्मिक कथा सुंदर शैलीत सादर केल्याबद्दल त्यांना हा बहुमान मिळाला आहे. हान कांग यांनी 1993 मध्ये कविता लिहून करिअरची सुरुवात केली. 1995 मध्ये त्यांनी कथा लिहायला सुरुवात केली. नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या हान कांग या अठराव्या आणि पहिल्या कोरियन महिला आहेत. यापूर्वी 2016...

मुख्यमंत्री पुत्राला पाठिंबा देणारे कलानी तुतारी घेण्याची शक्यता:जयंत पाटील, सुळेंची भेट; उल्हासनगरमधून इच्छुक

लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा देणारे माजी आमदार पप्पू कलानी हे तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पप्पू कलानी यांच्यासह त्यांची सून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. पप्पू कलानी यांच्यासह त्यांचे पुत्र ओमी कलानी आणि सून पंचम कलानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष...

अजित पवारांच्या शिलेदाराला नाना पटोले यांनी डिवचले:सत्तेची मौजमस्ती आणि देशाची संपत्ती विकून श्रीमंत होण्याचे काम करत असल्याची टीका

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार यांचे खंदे समर्थक प्रफुल्ल पटेल यांना डिवचले आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका करत नाना पटोले यांनी जोरदार निशाणा साधला. पाच वर्ष सत्तेची मौजमस्ती करणे आणि देशाची संपत्ती विकणे आणि तिथूनच श्रीमंत होणे, असे काम या लोकांनी केल्याचे पटाले यांनी म्हटले आहे. प्रफुल्ल पटेल यांनी भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील जनतेची मत घेऊन त्यांना मोठी...

रतन टाटांना राज्य सरकारची अनोखी श्रद्धांजली:गेल्या वर्षी पहिला पुरस्कार स्विकारणाऱ्या टाटांच्या नावानेच या पुढे उद्योगरत्न पुरस्कार

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला आता रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे. त्यामुळे आता उद्योगरत्न रतन टाटा पुरस्कार असे या पुरस्काराचे नाव असेल. व्यवसाय, उद्योग, शिक्षण, रिअल इस्टेट, पर्यटन, वित्तीय सेवा, फॅशन, इलेक्ट्रॉनिक्स, कृषी, बँकिंग या क्षेत्रांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने हा पुरस्कार देण्याचा निर्णय गेल्या वर्षीच घेण्यात आला होता. त्यानंतर...

रेखा @70: पदार्पणाच्या सिनेमात अभिनेत्याने जबरदस्तीने चुंबन घेतले:पतीच्या मृत्यूनंतर काळ्या जादूचा आरोप, म्हणाल्या- अमिताभचे माझ्या मनावर अधिराज्य

‘अर्थात मी त्यांच्यावर प्रेम करते. तुम्ही जगातील सर्व प्रेम घ्या आणि त्यात आणखी काही जोडा, मला त्या व्यक्तीबद्दल असे वाटते. मी त्यांना अवॉर्ड फंक्शन्समध्ये पाहते आणि ते माझ्यासाठी पुरेसे आहे. मी त्यांच्याशी बोलणे आवश्यक नाही, त्यांचे पूर्णपणे माझ्या मनावर अधिराज्य आहे. ते माझ्यासाठी खूप खास आहेत. ते मला काहीही बोलले नाही किंवा माझ्याकडे बघितले नाही तरी मला आनंद होईल. रेखा...

रतन टाटा ‘भारतरत्न’ नाहीत तर मग काय?:राज ठाकरेंचे PM मोदींना पत्र, टाटांना भारतरत्न देण्याची मागणी; हयातीतच सन्मान करण्याचे धोरण आखण्याची विनंती

राज्य सरकारनंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही केंद्र सरकारकडे दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. रतन टाटा यांना ते हयात असतानाच भारतरत्न पुरस्कार देण्याची गरज होती. पण आता किमान मरणोत्तर तरी त्यांना हा पुरस्कार दिला गेला पाहिजे अशी माझी व माझ्या पक्षाची इच्छा आहे, असे ते म्हणालेत. भारत हा रत्नांची खाण आहे....

-