भाजप आमदार दिवसा फार्महाऊसवर रात्री तुरुंगात:शिवसेना नेत्याचा गणपत गायकवाड यांच्यावर कायद्याची थट्टा चालवल्याचा आरोप
भाजपचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड हे सध्या उल्हासनगर पोलिस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी जेलमध्ये आहेत. मात्र ते दिवसभर फार्म हाऊसवर जाऊन एन्जॉय करतात आणि रात्री 10 वाजता जेलमध्ये जातात, असा धक्कादायक आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांनी केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना महेश गायकवाड म्हणाले, गणपत गायकवाड हे आठवड्यातून, 15 दिवसांतून चेकअपच्या नावाखाली जे जे रुग्णालयात...