ऑस्कर 2025 वर कॅलिफोर्नियातील आगीचा प्रभाव:नामांकन घोषणेची तारीख वाढवली, लॉस एंजेलिसमधील स्नेहभोजन रद्द

ऑस्कर 2025 ची नामांकने 17 जानेवारी रोजी जाहीर होणार होती, मात्र, आता कॅलिफोर्नियातील जंगलातील आगीमुळे ती पुढे ढकलण्यात आली आहे. वणव्यामुळे शेकडो घरे जळून खाक झाली असून त्यात अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरांचा समावेश आहे. आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ऑस्करच्या नामांकनाच्या तारखेत बदल करण्यासोबतच नामांकित व्यक्तींचा स्नेहभोजन समारंभही रद्द करण्यात आला आहे. मतदानाची तारीखही वाढवण्यात आली आहे. मात्र,...

रोहित रणजी सराव सत्राला येणार:10 वर्षांनंतर स्पर्धा खेळू शकतो; गिल पंजाबकडून खेळण्याची शक्यता

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी रणजी संघाच्या सराव सत्रात सहभागी होणार असल्याची माहिती मुंबई संघ व्यवस्थापनाला दिली आहे. हे सत्र वानखेडे स्टेडियमच्या सेंटर विकेटवर होणार आहे. या निर्णयामुळे रोहितच्या देशांतर्गत प्रथम श्रेणी स्पर्धेत प्रवेशाचे संकेत मिळाले आहेत. तथापि, रोहितने रणजीमध्ये खेळण्याबाबत मुंबई संघ व्यवस्थापनाशी पुष्टी केलेली नाही. सध्या रोहित वांद्रे येथे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सराव करत आहे. तर शुभमन गिल...

इस्रायल आणि हमास यांच्यात लवकरच युद्धविराम:पहिल्या टप्प्यात 33 ओलिसांची सुटका; उर्वरित 15 दिवसांनी सोडले जातील

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीबाबतचा करार लवकरच पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी इजिप्त, कतार आणि अमेरिकेच्या मदतीने कतारची राजधानी दोहा येथे चर्चा सुरू आहे. इस्त्रायली अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, कराराच्या पहिल्या टप्प्यात 33 ओलिसांची सुटका केली जाईल. हमासकडे 94 इस्रायली ओलीस आहेत, त्यापैकी सुमारे 34 मरण पावले आहेत. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने 251 इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले होते. उर्वरित ओलीसांची...

वाल्मीक कराडच्या आईचे परळीत ठिय्या आंदोलन:म्हणाल्या – माझा लेक देवमाणूस, त्याला न्याय मिळेपर्यंत येथून हलणार नाही

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी भावाला न्याय देण्याच्या मागणीसाठी सोमवारी धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. तर खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांनी परळी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला आहे. माझ्या मुलाने काही केले नाही. त्याला सोडावे, अशी पारुबाई कराड यांची मागणी आहे. वाल्मीक कराड याला संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटक झालेली...

इस्रायल आणि हमास यांच्यात लवकरच युद्धविराम:पहिल्या टप्प्यात 33 ओलिसांची सुटका; उर्वरित 15 दिवसांनी सोडले जातील

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीबाबतचा करार लवकरच पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी इजिप्त, कतार आणि अमेरिकेच्या मदतीने कतारची राजधानी दोहा येथे चर्चा सुरू आहे. इस्त्रायली अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, कराराच्या पहिल्या टप्प्यात 33 ओलिसांची सुटका केली जाईल. हमासकडे 94 इस्रायली ओलीस आहेत, त्यापैकी सुमारे 34 मरण पावले आहेत. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने 251 इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले होते. उर्वरित ओलीसांची...

महाविकास आघाडीत कोणतीही कटुता नाही:कटुता सत्ताधारी महायुतीत, शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांचा दावा

महाविकास आघाडीत कोणतीही कटुता नाही. कटुता ही सत्ताधारी पक्षात आहे. शरद पवार आणि मी भेटलो, यात नवीन काय आहे? महाराष्ट्रात एकमेकांना भेटत राहिले पाहिजे, असे विधान संजय राऊत यांनी केले. आज शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत, त्यावर लक्ष ठेवा, असेही राऊत म्हणाले विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्यातच संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी महानगरपालिका...

रत्नागिरीत विद्यार्थिनीची छेड; शिक्षकास बदडले:प्रकरण तापल्यानंतर कंत्राटी शिक्षकाचे केले निलंबन

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची छेड काढल्याने पालकांनी शिक्षकाला चांगलेच बदडल्याची घटना रत्नागिरी शहरात घडली. रत्नागिरी शहरातील एका नामांकित शाळेत हा प्रकार घडला. याप्रकरणी गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी शिक्षकास ताब्यात घेतले आहे. पीडित मुलीचा जबाबही पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. मुलीने तिच्या पालकांना शिक्षकाच्या या अश्लील कृत्याची माहिती दिल्यानंतर पालकांनी थेट शाळा गाठली आणि शिक्षकाला चोपले. या वेळी त्या शिक्षकाने उडवाउडवीची उत्तरे...

आपल्या चौकात आपली अवकात वाढवायची:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार, महादेव जानकरांची घोषणा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केली आहे. मोठ्या पक्षांना आमच्यासारख्या छोट्या पक्षांची गरज नसते. आपल्या चौकात आपली अवकात वाढवायची ते माझ्या बुद्धीला पटते म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष बुथप्रमुखापासून वॉर्ड प्रमुखापर्यंत तालुकाध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष, राज्य आणि केंद्रीय पातळीवर आम्ही टार्गेट ठेवले आहे, असे महादेव जानकर यांनी स्पष्ट केले आहे. महादेव जानकर...

मी यापुढे निवडणूक लढणार नाही:लोकांना विकास नकोय, जातीपातीचे राजकारण सुरू आहे; अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा

शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. सिल्लोड येथील अंभई येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना अब्दुल सत्तार यांनी ही घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कार्यक्रमात बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, मी आमदार-मंत्री असताना 18-18 तास सालदार महिनदार सारखे काम केले. शासकीय योजनेचा लाभ अनेक महिलांना व कामगारांना मिळवून दिला,...

मंत्रालयात महागडी लम्बोर्गिनी कार कोणाची?:व्यक्ती महागडा असला की सिस्टीम कशी झुकते, रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एक काळ्या रंगाची लम्बोर्गिनी कार आली होती. या महागड्या कारमधून एक व्यक्ती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्यासाठी आली असल्याची माहिती नंतर समोर आली. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी टीका केली आहे. रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हंटले, व्यक्ती महागडा असला की सिस्टीम कशी झुकते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे...

-