ओबीसी विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार:डिजिटल क्लास रूम प्रकल्प राबविण्यात येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
सह्याद्री अतिथीगृहात मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी महाज्योती या संस्थेमार्फत पुणे, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ठता केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या विजाभज प्रवर्गाच्या खासगी अनुदानित निवासी आश्रमशाळामधील...