शिवसेनेच्या माजी खासदाराने पाठवले अमित शहांना पत्र:भारतमातेची डिजीटल प्रतिमा देशातील सर्व विमानतळांवर बसवावी, राहुल शेवाळेंची मागणी
शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवत एक मागणी केली आहे. भारताचा समृध्द ऐतिहासिक वारसा, मूल्ये, संस्कृती आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असणाऱ्या भारतमातेची डिजीटल प्रतिमा देशभरातील सर्व विमानतळांच्या टर्मिनसवर बसवण्यात यावी, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी पत्रातून केली आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबतची माहिती एक्स अकाऊंटवरून दिली आहे. राहुल शेवाळे म्हणाले, भारताचा समृध्द...