बांगलादेशात दुर्गापूजेसाठी बनवलेल्या मूर्तीची तोडफोड:मूर्तीचे हात वेगळे केले; जाळपोळीचाही प्रयत्न, लष्कर आणि पोलीस घटनास्थळी दाखल
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेसाठी बनवण्यात येत असलेल्या मूर्ती फोडल्याची घटना समोर आली आहे. मेघालय सीमेला लागून असलेल्या बांगलादेशातील शेरपूर जिल्ह्यातील एका मंदिरात 31 ऑगस्टच्या रात्री काही समाजकंटकांनी ही घटना घडवली. शनिवारी रात्री उशिरा शेरपूरच्या बारवारी मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मंदिर समितीचे सरचिटणीस सागर रविदास यांनी सांगितले की, काही चोरट्यांनी मंदिराचे कुलूप व साखळी तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्यांनी...