आज सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प:फडणवीस दुसऱ्यांदा सादर करणार बजेट; शेतकरी, लाडक्या बहिणींचे बजेटकडे विशेष लक्ष
Category: Maharashtra |
06 Mar 2026
राज्याचा अर्थसंकल्प आज, शुक्रवारी विधीमंडळात मांडण्यात येणार आहे. राजकीय कारकीर्दीत देवेंद्र फडणवीस हे दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे फडणवीस यांनी वित्त खात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. त्यामुळे ते यंदाचा (2026-27) चा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम 1500 वरून 2100 होणार का? तसेच सरकारच्या इतर योजनांना किती निधी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहूया विधीमंडळ कामकाजाशी संबंधित घडामोडी संक्षिप्त स्वरुपात….