आशिष शेलार वैफल्यग्रस्त; चर्चेत राहण्यासाठी वक्तव्ये करतात:मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलेल्या खात्यामध्ये दम नाही, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

Maharashtra | 04 Nov 2025, 11:15 | Source: DivyaMarathi

आशिष शेलार यांना सध्या कुणी विचारत नाही, त्यांचे मुंबई अध्यक्षपद गेले आहे. एमसीएमध्ये देखील त्यांना कुणी विचारत नाही. त्यांना मुख्यमंत्र्यांनी अगदीच साधे खाते दिले आहे, त्यामध्ये काही दम नाही, या सर्व गोष्टीमुळे आशिष शेलार वैफल्यग्रस्त झाले आहेत, आणि चर्चेत येण्यासाठी ते असे काही तरी करतात, आमची सहानुभूती त्यांच्यासोबत आहेत असे म्हणत आशिष शेलार यांच्यावर टीका केला आहे. संदीप देशपांडे म्हणाले की, दुबार मतदारांमध्ये जाणीवपूर्वक हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई असे आणायचे भाजपचे नरेटिव्ह पसरवण्याचे साधन आहे. मी पोस्ट करत भाजपचे नेते हे किती खोटारडे आणि दुतोंडे आहेत हे उघडे केले आहे. दुबार मतदारांच्या विषयावर सर्व जण बोलत आहेत. पण हिंदू मुस्लिम करायचे तसा नरेटिव्ह पसरवण्याचे काम भाजपकडून सुरू आहे.विधानसभेला कटेंगे तो बटेंगेच्या पुढची पायरी आता ते तयार करू पाहत आहेत, पण जनता त्यांना नाकारेल. आमदार सुर्वेंना जनता धडा शिकवेल संदीप देशपांडे म्हणाले की, प्रकाश सुर्वे हे पहिले शिवसेनेचे कमांडर होते पण आता ते लाचार सेनेचे कमांडर झाले आहेत. मतांच्या लाचारीसाठी ते काहीही बोलत आहे.या लाचारांना येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस धडा शिकवेल. साटमांच्या मतदारसंघात बोगस मतदार संदीप देशपांडे म्हणाले की, आमदार अमित साटम यांच्या अंधेरी पश्चिम मतदार संघात शेख बनू इस्माईल शेख या मतदाराच्या घर क्रमांक अम्माकीच असा आहे हा नेमका काय ते अमित साटमच सांगू शकतील. त्यामुळे आम्ही कुठले मतदार दाखवले कुठले नाहीत? मला असे वाटते दुबार दुबार मतदाराच असतो, बोगस मतदार हा बोगस मतदारच असतो. त्याला जात,धर्म,भाषा हे काहीही नसते. आम्ही बोगस मतदाराला राज ठाकरेंनी सांगितलेली ट्रीटमेंट देणार मग तो कुठल्याही जाती-धर्माचा असो. शेलारांनी गठ्ठा पाहून बोलावे आशिष शेलार हे काल पत्रकार परिषदेत म्हणाले की, कोणाचंही तुष्टीकरण नाही सगळ्यांना न्याय,
मी जो फोटो पोस्ट केला आहे तो तुष्टीकरणाचा फोटो आहे का जस्टिसचा फोटो आहे. हे एकदा आशिष शेलार यांनी सांगावे, असे मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. तर राज ठाकरेंकडे दुबार मतदारांच्या यादीचा गठ्ठा होता तो तुम्ही बघायला आलात का? एकदा यादी बघा आणि मग काय ते शेलारांनी बोलावे. देशपांडेंची पोस्ट काय? संदीप देशपांडे यांनी X वर पोस्ट करत म्हटलंय की, खास अशिशुद्दीन यांच्या साठी अमित साटम यांच्या मतदार संघातील बोगस घोटाळा असे म्हणत दोन फोटो पोस्ट केले आहे.