दुजाभाव -होळी विशेष 4 रेल्वे पूर्णा, हिंगाेली, अकाेलामार्गे सोडणार:प्रवासी वाहतुकीतून 104 कोटी, पण विशेष रेल्वेतून संभाजीनगर वगळले
दुजाभाव -होळी विशेष 4 रेल्वे पूर्णा, हिंगाेली, अकाेलामार्गे सोडणार:प्रवासी वाहतुकीतून 104 कोटी, पण विशेष रेल्वेतून संभाजीनगर वगळले
दक्षिण मध्य रेल्वे झाेनमध्ये प्रवासी तिकीट विक्रीतून दहाव्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर झेप घेणाऱ्या छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावरून एकही हाेळी विशेष रेल्वे साेडण्यात आलेली नाही. नांदेड विभागात नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकाचा सर्वाधिक महसूल आहे. पिटलाइन अद्याप सुरू नाही, स्थानकाच्या दक्षिणेकडे तिकीट खिडकी नाही. विशेष रेल्वे अथवा सणानिमित्तही रेल्वे साेडली जात नाही. या वर्षी हाेळी विशेष ४ रेल्वे पूर्णा, हिंगाेली, अकाेलामार्गे सोडण्यात येणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेने नेहमीच छत्रपती संभाजीनगर व मराठवाड्याच्या प्रवाशांकडे दुर्लक्ष केलेले आहे. दक्षिणेकडील प्रवाशांसाठी साेयीच्या असलेल्या रेल्वे चालवण्यात दक्षिण मध्य रेल्वे अथवा दक्षिण रेल्वे चेन्नई प्राधान्य देत आले आहे. रेल्वे प्रश्नांचे अभ्यासक स्व. अोमप्रकाश वर्मा दरवर्षी नवीन रेल्वे आणि विशेष रेल्वे साेडण्यासाठी सातत्याने मागणी करीत हाेते. सर्व विशेष रेल्वेत दुजाभाव संभाजीनगर स्थानकावरून मुंबई, गाेवा, नवी दिल्ली, जयपूर, बिकानेर, अयाेध्या आदींसाठी माेठी मागणी आहे. मात्र, रेल्वे प्रशासन त्याकडे कानाडाेळा करते. संभाजीनगर आौद्याेगिक व पर्यटननगरी असल्याने पर्यटकांची माेठी गर्दी असते. येथून बाहेर जाणाऱ्या पर्यटकांना विमानाएेवजी रेल्वे साेयीस्कर आहे. मात्र, विशेष रेल्वेत संभाजीनगरला वगळले जाते. १०४ काेटी उत्पन्न, मात्र रेल्वे नाही छत्रपती संभाजीनगर स्थानकाचे २०२४-२०२५ मध्ये एकही मूळ रेल्वे नसताना (आरंभ बिंदू) १०४ काेटी ५६ लाख ५४ हजार ९१९ रुपये इतके उत्पन्न प्रवासी वाहतुकीतून मिळाले. येथून अहमदाबाद, जाेधपूर, बंेगळुरू, गाेवा, तिरुवनंतपुरम,अयाेध्या, वाराणसी आदी ठिकाणी रेल्वे सुरू असत्या तर उत्पन्न २०० काेटींवर गेले असते.- स्वानंद साळुंके, रेल्वे अभ्यासक, छत्रपती संभाजीनगर. महसुलात संभाजीनगर विभागात नवव्या स्थानी येऊनही दुर्लक्ष छत्रपती संभाजीनगर येथून उत्तर भारतामध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यात सुट्यांच्या कालावधीत वाढ होते. असे असतानाही सचखंड एक्स्प्रेस हाच महत्त्वाचा पर्याय प्रवाशांसमोर असतो. विशेष रेल्वे छत्रपती संभाजीनगरमार्गे सोडण्यात याव्यात यासाठी संभाजीनगरसह जालना मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. अॅनालिसिस - दक्षिणेतील प्रवाशांसाठी दक्षिण भारतातील भाविक शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. दक्षिण-मध्य रेल्वे तेथील प्रवाशांची सोय पाहिली जाते शिर्डीकडे सकाळी रेल्वे येते. दिवसभरात दर्शन घेऊन सायंकाळी भाविक परतीच्या प्रवासाला निघू शकतील असे वेळापत्रक तयार केले जाते. संभाजीनगर आणि जालना येथील औद्योगिक वसाहतींमध्ये उत्तर भारतातील कामगार-कर्मचारी मोठ्या संख्येने काम करतात. त्यांच्यासाठी विशेष रेल्वेचा काही फायदा नाही. हाेळी विशेष रेल्वेंचे असे आहे नियोजन