जोडीदाराला अल्पाइन पर्वतावर सोडतात पुरुष:ऑस्ट्रियातील गंभीर वास्तव- पुरुष समस्या सोडवण्याऐवजी पळ काढताहेत
Category: International |
29 Apr 2026
काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेत, ऑस्ट्रियातील सर्वात उंच शिखर ‘ग्रॉसग्लॉकनर’वर ट्रेकिंगदरम्यान थॉमस पी. नावाचा गिर्यारोहक आपल्या गर्लफ्रेंडला एकटे सोडून पुढे निघून गेला. थंडीने गोठून त्या महिलेचा मृत्यू झाला. ऑस्ट्रियाच्या न्यायालयाने या प्रकरणात थॉमसला ‘सदोष मनुष्यवध’ प्रकरणी दोषी ठरवले. अभियोक्त्यांच्या मते, थॉमसच्या फोनमध्ये सिग्नल होते, तरीही त्याने वेळेवर मदतीचा संदेश पाठवला नाही. याच प्रकरणानंतर सोशल मीडियावर ‘अल्पाइन डिव्होर्स’ हा शब्द चर्चेत आहे. याचा अर्थ असा की- ट्रेकिंग किंवा डोंगरासारख्या धोकादायक ठिकाणी एखादा पार्टनर आपल्या कमी अनुभवी (महिला) जोडीदाराला एकटे आणि असुरक्षित सोडून पुढे निघून जातो किंवा तिथेच सोडून देतो. कॅलिफोर्नियाच्या लॉरी सिंगर यांचा असाच भयावह अनुभव लॉरी यांनी २०१६ मध्ये एका पुरुष मित्रासोबत ३५७ किमी ट्रेकिंग केले होते. उंचीमुळे प्रकृती बिघडल्यानंतर आणि मेंदूला सूज आल्यानंतरही तो लॉरी यांना सोडून पुढे निघून गेला. नंतर त्याने सांगितले की, तो त्यांची 'परीक्षा' घेत होता. ‘अल्पाइन डिव्होर्स’ शब्द कोठून आला आणि बचाव काय? ‘अल्पाइन डिव्होर्स’ हा शब्द सर्वात आधी १८९३ मध्ये लेखक रॉबर्ट बर्र यांच्या एका कथेत आढळतो. लॉरी सिंगर म्हणतात की, कितीही विश्वास असला तरी ॲडव्हेंचर ट्रिपवर नेहमी 'आत्मनिर्भर' राहा. संकटकाळातच माणसाचा खरा चेहरा समोर येतो. मानसशास्त्रज्ञांच्या मते हा वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न रिलेशनशिप कोच जो हेमिंग्ज यांच्या मते, काही पुरुष समस्या सोडवण्याऐवजी तिथून पळ काढतात. ते महिला जोडीदाराबद्दल सहानुभूती दाखवण्याऐवजी वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. महिला सोशल मीडियावर अनुभव शेअर करत आहेत या केसदरम्यान सोशल मीडियावर अनेक महिलांनी आपले अनुभव शेअर केले. एक व्हिडिओ सुमारे ५० लाख वेळा पाहिला गेला. यात एका महिलेने ओसाड पहाडी रस्त्यावर स्वतःचा व्हिडिओ टाकून लिहिले की, तिला तेव्हा समजले की तिच्या पार्टनरने तिला कधी आवडीने स्वीकारलेच नव्हते. दुसऱ्या एका महिलेने सांगितले की, ट्रेकिंगदरम्यान तिचा पार्टनर मैलोनमैल पुढे निघून गेला होता, तर ती एकटी संघर्ष करत होती.