खामेनी यांच्या मृत्यूनंतर शिया समुदाय रस्त्यावर:इराणमध्ये 'डेथ टू अमेरिका' च्या घोषणा, अमेरिकेत जल्लोष; हल्ल्यापासून विनाशापर्यंतची व्हिडिओ टाइमलाइन
Category: International |
01 Mar 2026
इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. यानंतर इराणच्या रस्त्यांवर लोक शोक करताना दिसले. लोकांनी ‘डेथ टू अमेरिका’ आणि 'डेथ टू इस्रायल'च्या घोषणा दिल्या आणि प्रत्युत्तरादाखल कारवाईची मागणी केली. भारतातही शिया समुदायाचे लोक खामेनी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले. श्रीनगर, लेह, लखनऊ येथून निदर्शनांची छायाचित्रे समोर आली. मात्र, अमेरिका आणि इराणच्या काही भागांमध्ये लोकांनी या बातमीवर आनंदोत्सवही साजरा केला. अमेरिका-इस्त्रायलच्या इराणवरील हल्ल्यापासून ते खामेनी यांच्या मृत्यू आणि मध्यपूर्वेतील बिघडलेल्या परिस्थितीची संपूर्ण VIDEO टाइमलाइन पाहा.