मप्र-राजस्थानमध्ये सिरपमुळे 22 दिवसांत 7 मुलांचा मृत्यू:किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यू, राजस्थानमध्ये औषधावर बंदी
मप्र-राजस्थानमध्ये सिरपमुळे 22 दिवसांत 7 मुलांचा मृत्यू:किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यू, राजस्थानमध्ये औषधावर बंदी
मागील २२ दिवसांत मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमुळे सात मुलांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे १५ दिवसांत किडनी निकामी झाल्यामुळे एकामागून एक सहा मुलांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात दूषित डायथिलीन ग्लायकोलमुळे मूत्रपिंड निकामी झाल्याचे उघड झाले आहे. पाच ते सहा मुलांवर नागपूरमधील विविध रुग्णालयांमध्ये व काहींवर छिंदवाडा येथील सरकारी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यापैकी दोन किंवा तीन मुलांची प्रकृती गंभीर आहे. राजस्थानमधील सिकर येथील सरकारी रुग्णालयात मोफत औषध योजनेअंतर्गत देण्यात येणारे कफ सिरप खाल्ल्याने सोमवारी एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी भरतपूरमधील एका मुलाचा व सीएचसीचा प्रमुखही ते सेवन केल्यानंतर गंभीर आजारी पडले. एका मुलाच्या मृत्यूनंतर राजस्थानने संपूर्ण राज्यात डेक्सट्रोमेथोर्फन एचबीआर सिरप आयपी १३.५ मिलिग्रॅम/५ मिली (४४०) च्या बॅचच्या वितरणावर बंदी घातली आहे. औषधाचा नमुना चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील तीन खोकल्याच्या सिरपपैकी एक इंदूर, एक तामिळनाडू, एक हिमाचलमध्ये बनताे : मध्य प्रदेशात घेतलेल्या तीन खोकल्याच्या सिरपच्या नमुन्यांपैकी एआरसी सिरप इंदूरमध्ये बनवले जाते. कोल्ड्रिफ तामिळनाडूमध्ये बनवले जाते. नेक्स्ट्रॉस डीएस हिमाचल प्रदेशमध्ये बनवले जाते. २०२२ मध्ये आफ्रिकन देश गांबियामध्ये कथितरित्या दूषित खोकल्याच्या सिरपमुळे ६६ मुलांचा मृत्यू झाला. त्यानंतर डब्ल्यूएचओने भारतात बनवलेल्या चार खोकल्याच्या सिरपबद्दल अलर्ट जारी केला हाेता. नमुने घेतलेल्या कफ सिरपने मृत्यू शक्य राजस्थानमध्ये बंदी घातलेले खोकल्याच्या सिरपमध्ये डेक्सट्रोमेथोर्फन हायड्रोब्रोमाइड असते. ते खोकला दाबण्यासाठी वापरले जाते. ते ओपिआॅइडसारखे कार्य करते. याचा अर्थ ते वेदनाशामक नाही. ते फक्त खोकला दाबते. जास्त प्रमाणात घेतल्याने चक्कर येणे, नशा होणे, मळमळ होणे, गोंधळ होणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये मेंदूचा त्रास होऊ शकतो. मध्य प्रदेशात घेतलेल्या कफ सिरपच्या नमुन्यांमध्ये डायथिलीन ग्लायकोल (डीईजी) असते. हे कफ सिरप नाही तर एक औद्योगिक रसायन/विद्रावक आहे. तयारीमध्ये वापरलेले विद्रावक ०.१% पेक्षा जास्त असेल तर ते अत्यंत धोकादायक आहे. यामुळे मूत्रपिंड निकामी होणे. यकृताचे नुकसान, न्यूरोलॉजिकल समस्या व मृत्यू देखील होऊ शकतो. अनेक देशांत डायथिलीन ग्लायकोलने दूषित सिरपने मुले दगावली होती.