पाहुण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी यजमानाची:मोदी म्हणजे अमेरिकेच्या हातातील कटपुतली, इराणच्या नौदलाच्या मुद्द्यावरून राऊतांनी केंद्र सरकारला सुनावले
Category: Maharashtra |
06 Mar 2026
निवडणुकीची गरज नसेल तर महाराष्ट्रात कोणीही घोडेबाजार करु नये या मताचा मी आहे. राज्यसभा आणि विधान परिषद उमेदवार निवडून देण्याइतके संख्याबळ मविआकडे आहे. त्यामुळे कोणीही घोडेबाजार करण्याचा विचार करू नये. त्यामुळे राज्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागत आहे. आकडे जुळत असतील तर विधान परिषदेच्या एक काय दोन जागा विरोधी पक्ष जिंकू शकतो. सरकार पक्षाकडे पाशवी बहुमत आहे. त्यांनी राज्यात घोडेबाजार करू नये. दिल्लीतील सरकार हे घोडेबाजार करत आणलेले सरकार आहे. पण राज्याची परिस्थिती तशी नाही त्यांच्याकडे बहुमत आहे, ते कसे आणले हा पुढचा प्रश्न आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, इराणचे नौदल आपल्या बोलवण्यावर इथे आले होते, त्यांना सुखरुप पाठवण्याची जबाबदारी आपली होती. पाहुण्याच्या सुरक्षेची काळजी घेणं ही यजमान देशाची भूमिका पाहिजे. ते इथून जात असताना अमेरिका हल्ला करते आणि इराणच्या सैनिकांना ठार केले जाते. यावर भारत काही भूमिका घ्यायला किंवा निषेध करायला तयार नाही. आपल्या देशाला परराष्ट्र धोरण राहिलेले नाही, भारत कुणाचा तरी गुलाम म्हणून काम करतोय की काय हे चिंताजनक चित्र आम्हाला पाहायला मिळत आहे. भारताने दु:ख व्यक्त करायला खूप उशिर केला आहे. भारताने रशियाकडून तेल घेण्यासाठी अमेरिकेने परवानगी दिली आहे. आम्ही ठरवत नाही, अमेरिका भारताला नाचवत आहेत, मोदी हे त्यांची कटपुतली आहे. परवानगी ही गुलामांना दिली जाते. अमेरिकेच्या मेहरबानीवर जर आपण रशियाकडून तेल खरीदी करम असू तर काय फायदा. सामान्य कार्यकर्त्याला पद मिळत असेल तर स्वागतच संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेच्या पक्षाने राज्यसभेची उमेदवारी कुणाला द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या हायकंमाडने जर कुणाला उमेदवारी द्यायचे हे ठरवले असेल तर त्यावर मी मत व्यक्त करणार नाही. पण दलित शोषित कुटुंबातील व्यक्तीला जर पद मिळत असेल तर त्यांचे स्वागत करण्याची भूमिका आम्ही कायम घेतलेली आहे. आमचे मतभेद असतील पण सामान्य कार्यकर्त्यांना पद मिळत असेल तर त्यांचे स्वागत आहे. ज्योती वाघमारे आमच्यावर टीका करत असतील तर ते त्यांचे संस्कार आहे. मोदींनी मध्यस्थी करायला हवी होती संजय राऊत म्हणाले की, एका देशाच्या राष्ट्रप्रमुखाला अशा पद्धतीने ठार करणे हे जागतिक पातळीवर निषेधार्य आहेत. त्या देशातील सत्ता उलथवण्याचे काम लोकशाहीच्या माध्यमातून जनतेनेच केले पाहिजे. उद्या नरेंद्र मोदी यांच्या विषयी ट्रम्प यांना वाटले मी इथे सैन्य घुसवेल आणि मोदींना उलथवून टाकेल हे आम्ही होऊ देणार नाही. आम्ही त्यांच्या सत्तेचा पराभव लोकशाही मार्गाने करू. उद्या इस्त्रायलला वाटले मोदी आपले ऐकत नाही ते राष्ट्रहिताचे निर्णय घेऊ लागले आहेत, आम्ही त्यांच्यावर हल्ला करू तर एक देश म्हणून आम्ही हे कदापी होऊ देणार नाही. पण इराणसोबत जर असे होत असेल तर भारतासारख्या मोठ्या राष्ट्राने त्यांचा निषेध केला पाहिजे. मोदींनी या युद्धामध्ये मध्यस्थी करत हे युद्ध थांबवायला हवे होते.नरसंहार थांबवायला पाहिजे होता. सरकारने भूमिका घेणं गरजेचे संजय राऊत म्हणाले की, चीन आणि इराणसह जगातील प्रमुख राष्ट्र हे युद्धखोरीच्या विरोधात उभे राहतील. या जगात दोन देश युद्धखोर आहेत. भारताला याच दृष्टीने पुढे जावे लागणार आहे. नाटोचे सदस्य असणाऱ्या राष्ट्रांनी युद्धांतून माघार घेतली आहे. इराणचे लोकं झुजांर आहे, ते मागे हटणार नाही. हे युद्ध बरेच दिवस चालणार आहे. युद्धांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गोष्टीवर बंधंने आली आहेत, सराकारकडून यावर काहीही भूमिका घेतली जात नाही. आपल्या देशातील अनेक जण अखाती देशात अडकले आहेत. शिंदे गटावर निशाणा संजय राऊत म्हणाले की, शिंदे गटाला राज्यपाल पद नाही तर अमेरिका आणि फ्रान्समधील हाय कमीशनरची पदे देण्यात येणार आहे. राज्यपालपद हे फार लहान पद आहे, असे म्हणत शिंदे गटातील आनंदराव अडसूळ यांच्या नाराजींच्या चर्चांवर बोलताना म्हटले आहे.