राखी सावंतचा नवा 'बॉम्ब'!:म्हणाली- आईने जाताना चिठ्ठीत लिहिले, डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील
राखी सावंतचा नवा 'बॉम्ब'!:म्हणाली- आईने जाताना चिठ्ठीत लिहिले, डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील
आपल्या चित्र-विचित्र वक्तव्यांमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहणारी अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा एका धक्कादायक वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. आईच्या निधनानंतर दुबईला स्थलांतरित झालेली राखी नुकतीच मुंबईत परतली असून, 'पती पत्नी और पंगा' या शोच्या शूटिंगदरम्यान ती दिसली. यावेळी तिने पापाराझींशी संवाद साधताना केलेला एक दावा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. डोनाल्ड ट्रम्प माझे वडील एका कार्यक्रमादरम्यान राखी सावंत आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जात असताना पापाराझींनी तिला घेरले. काळ्या रंगाच्या पोशाखात असलेल्या राखीने यावेळी कॅमेऱ्यासमोर नाचून सर्वांचे लक्ष वेधले. त्यानंतर तिने केलेले वक्तव्य ऐकून उपस्थित सारेच अवाक् झाले. राखी म्हणाली, माझी आई आता जग सोडून गेली आहे. माझ्या आईने जग सोडण्यापूर्वी एक चिठ्ठी सोडली होती. त्यात लिहिले, डोनाल्ड ट्रम्प तुझे खरे वडील आहेत. राखीच्या या वक्तव्यावर पापाराझींनी "पण ते सध्या मोदीजींना त्रास देताना दिसत आहेत," असे मिश्किलपणे विचारले. यावर राखीने हात जोडून नाटकी आवाजात थॅंक यू सो मच, मेरे से पंगा ना लो असे उत्तर दिले. बिग बॉसमध्ये धमाका करणार याच व्हिडिओमध्ये राखी पुढे 'जा रही हूं बिग बॉस में और धमाका मचाऊंगी' असेही म्हणताना दिसली. राखीच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, अनेक लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. राखी सावंतने पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत माध्यमांचे आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.