ट्रम्प यांच्या मोठ्या घोषणेआधी ‘कुणी तरी’शेअर्समध्ये पैसा लावून कमावले कोट्यवधी:इनसायडर ट्रेडिंगचा संशय बळावला, सामान्य गुंतवणूकदारांच्या विश्वासाशी खेळ
ट्रम्प यांच्या मोठ्या घोषणेआधी ‘कुणी तरी’शेअर्समध्ये पैसा लावून कमावले कोट्यवधी:इनसायडर ट्रेडिंगचा संशय बळावला, सामान्य गुंतवणूकदारांच्या विश्वासाशी खेळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अनेकदा असे दिसून आले आहे की, त्यांच्या मोठ्या घोषणा किंवा सोशल मीडिया पोस्टच्या अगदी काही वेळ आधीच फायनान्शिअल मार्केटमध्ये ट्रेडिंगचा वेग अचानक वाढला. सोप्या भाषेत सांगायचे तर, अधिकृत माहिती सार्वजनिक होण्याच्या काही मिनिटे आधीच अचूक डाव लावून काही लोकांनी कोट्यवधींचा नफा कमावला आहे. बीबीसीच्या तपासात हे स्पष्टपणे दिसून येते की, काही खास माहिती आधीच लीक होत होती, ज्यामुळे सामान्य गुंतवणूकदारांच्या विश्वासाला तडा जात आहे. बीबीसीने वेगवेगळ्या बाजारपेठांमधील ट्रेड व्हॉल्यूम डेटाची तुलना ट्रम्प यांच्या बाजारपेठेवर परिणाम करणाऱ्या विधानांशी केली. यामध्ये वारंवार पॅटर्न पाहायला मिळाला- पोस्ट किंवा मुलाखत सार्वजनिक होण्याच्या काही तास, तर कधी काही मिनिटे आधीच ट्रेडिंगमध्ये मोठी वाढ झाली. काही विश्लेषक याला बेकायदेशीर ‘इनसाइडर ट्रेडिंग’सारखे संकेत मानत आहेत. अमेरिकेत ‘इनसाइडर ट्रेडिंग’ बेकायदेशीर आहे. २०१२ मध्ये अमेरिकन सरकारी अधिकाऱ्यांनाही या कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले होते. मात्र, या कायद्यांतर्गत आतापर्यंत कोणालाही शिक्षा झालेली नाही. २३ मार्च २०२६: ‘पूर्ण समाधान’ पोस्ट: १४ मिनिटांच्या खेळात २५० कोटींहून जास्त नफा ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ वर पोस्ट करून तेहरानसोबत ‘पूर्ण समाधान’ झाल्याची घोषणा केली. पोस्टनंतर शेअर बाजारामध्ये उसळी आली. अमेरिकन तेलाच्या किमतीमध्ये घसरण नोंदवली.
■ संशयास्पद हालचाल: ट्रम्प यांच्या पोस्टच्या १४ मिनिटे आधी तेलाच्या किमती घसरण्यावर मोठे डाव लावले गेले. याला ‘शॉर्ट सेलिंग’ म्हणतात, ज्यामध्ये ट्रेडर्स जास्त किमतीत तेल विकण्याचा सौदा करतात व दर घसरताच स्वस्त खरेदी करून नफा कमावतात. प्रति बॅरल १५ डॉलरच्या घसरणीमुळे त्या संशयास्पद काळात कोणाला तरी २५० कोटी रुपयांहून जास्त नफा झाला. २८ फेब्रु. २०२६: इराणवर हल्ल्यानंतर ६ नवीन खाती, पाच जणांनी पुन्हा डाव लावला नाही ब्लॉकचेन विश्लेषण साइट ‘बबलमॅप्स’ ने खुलासा केला की फेब्रुवारीमध्ये अचानक ६ नवीन खाती तयार झाली. ■ डाव: या सर्व खात्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत इराणवर अमेरिकन हल्ला होण्याच्या बाजूने मोठा पैसा लावला. ■ निकाल: जशी ट्रम्प यांनी हल्ल्याची पुष्टी केली, या खात्यांनी एकूण ९.९ कोटी (१२ लाख डॉलर) कमावले. ■ पॅटर्न: यापैकी ५ खात्यांनी यानंतर कधीही कोणताही डाव लावला नाही. एका दुसऱ्या खात्याने नंतर युद्धविरामाची अचूक भविष्यवाणी करून १.३५ कोटी रुपये आणखी कमावले. ३ जाने. २०२६: मादुरोना हटण्याच्या अंदाजावर खाते उघडले, कमाईनंतर नाव बदलून बंद ऑनलाइन प्रेडिक्शन मार्केट (जसे पॉलीमार्केट आणि कल्सी) सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर या मंचांशी जोडलेले आहेत. ■ डिसेंबर २०२५ मध्ये ‘बर्डनसम-मिक्स’ नावाचे एक नवीन खाते तयार झाले. ■ ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान, या खात्याने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो पद सोडण्यावर एकूण ३२,५०० डॉलर लावले. ■ ३ जानेवारीला मादुरो यांना पदावरून हटवले गेले. त्या खात्याने ३.६ कोटी रुपये जिंकले आणि लगेच आपले युजरनेम बदलून सक्रियता बंद केली. २ एप्रिल २०२५: टेरिफवर ९० दिवस स्थगिती, ट्रेडिंगमध्ये ३० पटीपर्यंत असामान्य उसळी ट्रम्प यांनी जागतिक आयातीवर भारी टेरिफ लावले, पण एका आठवड्यानंतर अचानक चीनला सोडून अन्य देशांना ९० दिवसांची सवलत दिली. या घोषणेमुळे बाजारामध्ये त्सुनामी आली आणि एसअँडपी ५०० इंडेक्स ९.५% वधारला, जी दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी वाढ होती. संशयास्पद रित्या संध्याकाळी ६:०० वाजता ट्रेडिंगचा वेग अचानक १०,००० कॉन्ट्रॅक्ट प्रति मिनिटाच्या पार गेला. रु.१६.५ कोटींचा डाव लावून काही ट्रेडर्सनी रु.१६५ कोटींचा नफा कमावला. खासदारांनी याची चौकशी करण्याची मागणी केली. ९ मार्च २०२६: ‘युद्ध जवळपास संपले आहे’, तेलामध्ये ४७ मिनिटे आधी डाव लागला इराण युद्धाच्या ९ व्या दिवशी ट्रम्प यांनी मुलाखतीत संघर्ष संपल्याचा दावा केला. बातमी रात्री ७:१६ वाजता ‘एक्स’ वर आली, ज्यामुळे तेलाच्या किमती २५% घसरल्या. परंतु संशयास्पद ट्रेडिंग ४७ मिनिटे आधी (६:२९ वाजता) सुरू झाली होती. ‘शॉर्ट सेलिंग’ द्वारे ४,००० कॉन्ट्रॅक्ट्सवर डाव लावून काही गुंतवणूकदारांनी सुमारे रु.४६० कोटींचा मोठा नफा कमावला, जो इनसायडर ट्रेडिंगचा संकेत आहे.