उद्धव ठाकरेंना चर्चेत राहण्यासाठीच वक्तव्ये करायची सवय:केंद्राचे पथक प्रस्तावाशिवाय आले का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

Maharashtra | 04 Nov 2025, 10:30 | Source: DivyaMarathi

उद्धव ठाकरे परवा म्हणाले केंद्राकडे मदतीसाठी प्रस्तावच दिला गेला नाही, पण जर प्रस्ताव दिलाच नसता तर केंद्रीय पथक मदतीसाठी महाराष्ट्रात कसे आले असते. त्यांना दिवसभर माध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी अशी वक्तव्य त्यांच्याकडून केली जात आहेत, असा टोला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्रात जे केंद्रीय पथक आले आहे ते जिल्ह्यामधील प्रत्येक मंडळामध्ये जाणार असून संपूर्ण सर्वेक्षण करतात आणि मग मदत करतात. केंद्र सरकारची राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका आहे. शेतकऱ्यांना जे चुकीचे चेक गेले ते कसे गेले संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करत या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. शेतकऱ्यांची थट्टा करणे योग्य नाही. कुठल्या अधिकाराने हे केले बघावे लागेल. आमदारांनी नाराज होऊ नये चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, हे वर्ष जरा शेतकऱ्यांसाठी आहे, हे वर्ष जुने स्पीलवर देण्याकरता आहे. अजून 5 वर्षे विकास करण्याकरता आहेत. त्यामुळे आमदारांनी निधी भेटला नाही म्हणून नाराज होण्याचे काही काम नाही. आमचे मुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे एकत्र बसून निधी बाबत निर्णय घेतील. राहुल गांधी हे प्रत्येक निवडणुकीनंतर बाहेर देशात फिरण्यासाठी जातात तसेच ते बिहार निवडणुकीनंतरही जातील. बिहारमध्ये महाराष्ट्राप्रमाणे एनडीएचे सरकार येणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पडोळे अपघाताने खासदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भंडाऱ्यांचे खासदार प्रशांत पडोळे यांनी जे वक्तव्य केले आहे ते बालिशपणाचे आहे. आमचे सरकार शेतकऱ्यांना मदत करत आहे. 32 हजार कोटी रुपयांचे मदतीचे पॅकेज सरकारने जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार काम करत आहे. यातील साडेनऊ हजार कोटी रुपये वाटप सुरू झाले आहे. प्रशांत पडोळे हे अपघाताने खासदार झाले आहेत त्यांनी बोलताना तारतम्य ठेवायला हवे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलण्यापूर्वी त्यांनी आपल्या नेत्याला विचारले पाहिजे. थोडे भान ठेवत बोलायला हवे. पडोळे प्रगल्भ नाहीत त्यामुळे त्यांच्या टीका ही बालिशपणाचे लक्षण आहे. वन्यप्राण्याचे हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रकाश सुर्वे यांच्या वक्तव्याबद्दल काही तरी संभ्रम होत असेल ते काय बोलले मला माहिती नाही मी ते काही ऐकले नाही. पुण्याजवळ बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलांचा जीव गेला हे दुर्दैवी आहे. बिबटे-वाघ गावाकडे यायला लागले आहेत यासाठी काहीतरी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचा आमचा निर्णय आहे. नागपूरमध्ये ज्या घटना घडल्या तेव्हा आम्ही कॅमेरे लावले. मंचर मध्येही वन विभागाची यंत्रणा तयार करावी लागेल, जी लगेच वाघ आणि बिबट्याला पकडेल. पडोळेंचे वक्तव्य काय? प्रशांत पडोळे म्हणाले, "शेतकऱ्यांना पीक विम्याचे फक्त 18 रुपये भेटले साहेब, 18 रुपयांनी काय होते? धोरणं बदलाना साहेब. धोरणं बदलाना आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत. तुम्ही जर आमच्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये दिले नाही. तुम्ही जर आमच्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये दिले नाही आणि त्यांचा हक्क दिला नाही, तर यावेळेस आम्ही आत्महत्या करणार नाही, यावेळेस आम्ही तुम्हाला उडवून देऊ साहेब." अशी धमकीच खासदार प्रशांत पडोळे यांनी दिली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. वाचा सविस्तर