पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण:अँटी इन्कबन्सीचा फटका बसू नये म्हणून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते

इथल्या सरकारबाबत गेल्या 10 वर्षांची जी अँटी इन्कबन्सी आहे.ती कमी करण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची शक्यता आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तर राष्ट्रवादी राजवट लागू केली तर आपल्याला सरकार टिकवता येईल. फक्त राष्ट्रपती राजवटीचा निर्णय पॉलिटिकल असेल. सरकारची तयारी नसेल ते लांबवू शकतात असे त्यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष निवडणूक वाचवू शकत नाहीत. तर एक मार्ग आहे की,राष्ट्रपती राजवट राबवायची. आता निवडणूक घेतली तर आपला पराभव निश्चित आहे, असे जर या सत्तेतील पक्षांना जर वाटत असेल म्हणून राष्ट्रपती राजवटीचा निर्णय होऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे, फक्त राष्ट्रपती राजवटीचा निर्णय पॉलिटिकल असणार आहे.सध्याच्या महायुती सरकारची तयारी नसेल तर ते निवडणूक लांबू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.
हरियाणा अन् महाराष्ट्राच्या निवडणुका सोबत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, 2009 मध्ये मतदारसंघांची पुर्नरचना झाली तेव्हापासून आत्तापर्यंत तीन निवडणुका झालेल्या आहेत. त्या हरियाणा आणि महाराष्ट्राच्या एकत्र झालेल्या आहेत. त्या एकत्र होणे स्वाभाविक आहे. पण यावेळी विशेष परिस्थिती किंवा थातूर मातूर कारण सांगून निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केलेले नाही. हरियाणाची निवडणूक 8 ऑक्टोंबरला संपुष्टात येईल. अनेक तर्कवितर्क सुरु आहेत. राज्यपाल रिपोर्ट देतील पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन वर्ष झालं निवडणुका झालेल्या नाहीत. संविधानातून आपण पॉलिटिकल आरक्षण दिलं. निवडणूक घेणार नसाल तर आरक्षणाचा काय उपयोग आहे? इथले राज्यपाल रिपोर्ट देतील, इथली परिस्थिती योग्य नाही किंवा सुप्रीम कोर्टाकडून विरोधात निकाल आला, तर आमदार निलंबित होतील,यांसारखी अनेक कारणं सांगून केंद्रातील भाजप नेते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी हालचाली करू शकतात.गृहमंत्र्याला थातूर मातूर कारण सांगून राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. राज्यपालांचा महाराष्ट्र दौरा विधानसभा निवडणुका वेळेमध्ये होणार की नाही, किंबहुना तसे झाले तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊन राज्यपालांच्या हाती सत्तेचे सुकाणू जाईल अशा पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला नाशिकमधील राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या दौऱ्यामध्ये चांगलेच बळ मिळाले. राज्यपाल राधाकृष्णन हे अचानक महाराष्ट्र दौऱ्यावर निघात मंत्र्यांपासून तर लहानमोठ्या कार्यकर्त्याला राज्यपाल भेटल्याने चर्चेला उधाण आले. यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ही चर्चा जोर धरु लागली आहे.

Share

-