युजर्सची मनं जिंकायला येतोय Redmi 11 Prime 5G, स्टायलिश डिझाईनसह मिळणार A1 फीचर्स

 

नवी दिल्ली: Redmi 11 Prime 5G India : 5G सेवा भारतात लवकरच रिलीज होणार असून अशा परिस्थितीत बरेच लोक नवीन स्मार्टफोन शोधत आहेत. जो या 5G नेटवर्कला सपोर्ट करेल. तुम्ही देखील अशा स्मार्टफोनच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Redmi लवकरच भारतात एक नवीन स्मार्टफोन Redmi 11 Prime 5G लाँच करणार आहे. जो दिसायला एकदम स्टायलिश आहे आणि त्याचे फीचर्स देखील जबरदस्त आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे फोनची किंमत देखील जास्त नाही. हा स्मार्टफोन ६ सप्टेंबर २०२२ ला लाँच करण्यात येणार असल्याची माहिती रेडमीकडून समोर आली आहे. हा फोन या वर्षाच्या सुरुवातीला चीनमध्ये Redmi 11E नावाने लाँच करण्यात आला आहे.

Redmi 11 Prime 5G ची भारतात किंमत:

लाँचच्या तारखेप्रमाणे, Redmi ने किंमतीबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. नवीन लीक्स आणि मीडिया रिपोर्ट्सनुसार, Redmi चा नवीन 5G स्मार्टफोन, Redmi 11 Prime 5G जवळपास $200 (सुमारे १६ हजार रुपये) च्या किमतीत लाँच केला जाऊ शकतो. हा फोन अनेक स्टोरेज वेरिएंटमध्ये बाजारात लाँच केला.


Redmi 11 प्राइम 5G चे फीचर्स:

अहवालांनुसार Redmi 11 Prime 5G १०८० x २०४८ पिक्सेलच्या ६.५८ -इंच फुल HD+ IPS LCD डिस्प्ले आणि ९० Hz च्या रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. हा फोन डायमेंसिटी ७०० चिपसेट प्रोसेसरवर काम करू शकतो आणि यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज दिले जाऊ शकते. ५००० mAh बॅटरी आणि १८ W रॅपिड चार्जिंग सपोर्टसह, या 5G स्मार्टफोनला ५० MP मुख्य कॅमेरा, २ MP डेप्थ सेन्सर आणि LED फ्लॅश दिला जाऊ शकतो. हा फोन Android 12 OS वर चालेल आणि त्यात ५ MP सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published.