संजय राऊत हे रिकामटेकडे, ते रोजच काहीतरी मत व्यक्त करतात:ठाकरे गटाच्या स्वबळाचा विषय देवेंद्र फडणवीसांनी एकाच शब्दात संपवला

संजय राऊत हे रिकामटेकडे आहेत. ते रोजच काहीतरी मत व्यक्त करतात. मात्र त्यांच्या मतावर मी व्यक्त व्हायलाच पाहिजे असे नाही. मला कामे असतात. मी रिकामटेकडा नाही. अशा कडक शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या स्वबळाच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूर येथे बोलत होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वभावावर लढवणार असल्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्वच महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका शब्दात उत्तर दिले आहे. त्यांच्या या घोषणेवर काहीही बोलण्यास मुख्यमंत्र्यांनी नकार दिला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवलेल्या निवडणुकीत लोकसभेत या तीनही पक्षांना चांगले यश मिळाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. या परभावानंतर महाविकास आघाडी टीकते का? असे प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यातच आता संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे राऊत यांची ही घोषणा म्हणजे महाविकास आघाडी अस्तित्वात राहणार नसल्याचे संकेत मानले जात आहे. नेमके काय म्हणाले होते संजय राऊत मुंबई ते नागपूपर्यंत सर्व महानगर पालिका, जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्वळावर लढण्याचे सांगितले आहे. या संदर्भात आम्ही पदाधिकाऱ्यांशी तशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्हाला देखील पाहायचे आहे की काय होते? असे देखील ते म्हणाले. आघाडीमध्ये लढताना कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. त्याचा पक्षाच्या वाढीला देखील फटका बसतो. त्यामुळे महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषदेमध्ये आम्ही स्वबळावर लढणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. काँग्रेसची मात्र, सावध भूमिका; वडेट्टीवार म्हणाले ठाकरेंशी चर्चा करणार या संदर्भात काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, इंडिया आघाडी अजूनही मजबूत आहे. दिल्लीमध्ये इंडिया आघाडी एकत्रीत काम करत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढलो होतो. तसेच आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील एकत्रीत लढवण्याचा आमचा प्रयत्न असेल. संजय राऊत हे त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांनी स्वबळावर निवडणुका लढण्याची घोषणा केली असली तरी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांना एकत्र लढवण्याची आम्ही विनंती करणार असल्याची माहिती देखील वडेट्टीवार यांनी दिली आहे.

Share

-