सावंतवाडीतील भाजप बंडखोराच्या कारवर हल्ला:हल्लेखोराला जंगलातून पकडले, आरोपी झारखंडचा असल्याची माहिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या बंडोखाराच्या गाडीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मळेवाड येथे ही घटना घडली असून भाजपचे बंडखोर विशाल परब बचावले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून तो झारखंडमधील असल्याची माहिती आहे. कोणी कितीही दहशत माजवली तरी निवडणूक लढवण्यापासून परावृत्त होणार नाही, असे विशाल परब यांनी म्हटले आहे. विशाल परब हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहे. त्यांनी बंडखोरी करत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज भरला आहे. विशाल परब बुधवारी रात्री मळेवाडी येथे नरकासुर स्पर्धेसाठी गेले होते. स्पर्धा आटोपून सावंतवाडीकडे घरी येत असताना सावंतवाडी मळगाव स्टेशनजवळ त्यांच्या गाडीवर एकाने बांबूने हल्ला केला. ड्रायव्हरने प्रसांगावधान राखत गाडी बाजूला घेतल्याने विशाल परब यांचा जीव वाचला. आरोपी झारखंडचा असल्याची माहिती
विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने जवळच्या जंगलात पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठीमागून येणाऱ्या स्थानिकांनी पाठलाग करून हल्लेखोराला ताब्यात घेतले. स्थानिकांनी त्याची चौकशी केली असता, आपण झारखंडमधील असल्याचे त्याने सांगितले. या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर विशाल परब यांच्या कार्यकर्त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गर्दी केली होती. याबाबतची तक्रार सावंतवाडी पोलिस ठाण्यात उशिरा देण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण हे अधिक तपास करत आहेत. निवडणूक लढवण्यापासून परावृत्त होणार नाही
हा हल्ला करण्याचा प्रयत्न सिंधुदुर्गच्या राजकारणाला शोभणारा प्रकार नाही, पोलिसांनी याचा योग्य तपास करावा, अशी प्रतिक्रिया हल्ल्यानंतर विशाल परब यांनी दिली आहे. कोणी कितीही दहशत माजवली, तरी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी निवडणूक लढवण्यापासून परावृत्त होणार नाही, असेही विशाल परब यांनी म्हटले आहे. हे ही वाचा… राज ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली:देवेंद्र फडणवीसांचे मत, भाजपमधील बंडखोरी शमवण्याचाही केला दावा निवडणुकीतील बंडखोरांचे बंड शमवण्यासाठी पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. महायुतीच्या काही मतदारसंघातही बंडखोरी झाली असून आम्ही त्यांच्याशी चर्चा करत आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवसापर्यंत महायुतीच्या जागांवर दाखल झालेले क्रॉस फॉर्म मागे घेतलेले असतील, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांनी व्यापक हिंदुत्वाची भूमिका घेतली, असेही म्हटले. पूर्ण बातमी वाचा…

Share

-