महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका कायम:वातावरणातील गारठा 2 ते 3 दिवस कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज; नाशिकला यलो अलर्ट

उत्तर भारताकडून ताशी 15 ते 20 किमी वाऱ्यांचा वेग कायम असल्याने महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका कायम आहे. शुक्रवारी दिवसभर गार वारे वाहत असल्याने नागरिकांना हुडहुडी भरली होती. नाशिक जिल्ह्यातील जेऊर येथे नीचांकी तापमान 6 अंश तर अहिल्यानगर येथे 8.5 अंश नोंद करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामातील निचांकी तापमान मागील दोन दिवसापासून नोंदवले जात आहे. त्याचप्रमाणे शनिवारी थंडाच्या लाटेची शक्यता देखील हवामान विभाग आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी संशोधन केंद्राने देखील वर्तवली आहे. संशोधन केंद्राने नाशिकला यलो अलर्ट दिला आहे. उत्तर महाराष्ट्रात पुढील 24 तासासाठी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील दोन ते तीन दिवस वातावरणातील गारठा कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्र थंडी वाढत असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे आणखी तीन ते चार दिवस राज्यात थंडीची लाट मोठ्या प्रमाणात दिसून येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर महाराष्ट्रा बरोबरच मराठवाड्यातील काही भागात देखील थंडीची लाट असल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येईत आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील थंडीची लाट पसरली असून तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. याचा सर्वाधिक फटका शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलांना बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील दोन दिवसात तापमान सरासरी पेक्षा खाली येताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणी कडाक्याची थंडी जानवत आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. महाराष्ट्राच्या CM पदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी:5 डिसेंबर रोजी 1 वाजता आझाद मैदानावर शपथविधी; BJPच्या ज्येष्ठ नेत्याची माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचीच वर्णी लागणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षातील एका ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्र्यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी 5 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. या संदर्भात सर्व तयारी ही पूर्ण झाली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. पूर्ण बातमी वाचा… शरद पवारांकडून पुन्हा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह:म्हणाले – अखेरच्या 2 तासांतील टक्केवारी अत्यंत धक्कादायक, जनतेने उठाव करणे आवश्यक देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यासंबंधीची अस्वस्थता ती सर्व भागात दिसून येत आहे. या निवडणुकीच्या निकालाबद्दल जनमत हे बाबा आढाव यांनी घेतलेल्या भूमिकेतून व्यक्त होत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशाचा महापूर दिसून आला. तो यापूर्वी कधीही बघितला नव्हता. स्थानिक पातळीवरील निवडणूक असतात, त्यामध्ये अशा तक्रारी कुठे न कुठे ऐकायला मिळतात. मात्र संपूर्ण राज्याची आणि देशाची निवडणूक असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा आणि सत्तेचा गैरवापर हा करून निवडणुकीची सर्व यंत्रणा हातात घ्यायची, असे चित्र यापूर्वी कधीही दिसले नव्हते, असे देखील पवार यांनी म्हटले आहे. असेच काही या निवडणुकीत महाराष्ट्रात घडले आहे आणि त्याचा परिणाम होऊन लोकांची अस्वस्थता वाढली असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. पूर्ण बातमी वाचा…

Share

-