या कारणांमुळे मोडला सोहेल खानचा 24 वर्षांचा सुखी संसार

 

अभिनेता सोहेल खान याची पूर्वाश्रमीची पत्नी सीमा सजदेह (Seema Sajdeh) सध्या फॅब्युलस लाइव्ह्ज ऑफ बॉलिवूड वाइव्ह्ज २ या वेब शो मध्ये सहभागी झाली . या कार्यक्रमामुळे सीमा सध्या खूपच चर्चेत आली आहे. कार्यक्रमाच्या नवीन पर्वामध्ये सीमाचं भरभरून कौतुक केलं जात आहे. या कार्यक्रमात सीमाबरोबर सहभागी झालेल्या कलाकारांच्या पत्नी धम्माल मस्ती करत आहेत त्याच प्रमाणे यावेळी त्यांनी त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा देखील केला.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सीमानं तिच्या घराबाहेर लावेली नावाची पाटी बदलताना दिसत आहे. सीमानं तिचं खान आडनाव बदलं आहे. तिनं घराबाहेरील नावाच्या पाटीवर सीमा, निर्वाण, योहान अशी नावं ठेवली आहेत. सीमाच्या या वागण्यानं हे तर आता स्पष्ट झालं आहे की, तिनं सोहेलबरोबर असलेल्या सर्व नाती संपुष्टात आणली आहेत.
(फोटो सौजन्य : टाईम्स ऑफ इंडिया )

​या कारणाने सीमानं घेतला घटस्फोट?

या कार्यक्रमात जेव्हा सोहेलबरोबरच्या घटस्फोटाबद्दल तिला विचारले गेले तेव्हा. त्यावर सीमा त्यांना सांगते की, गेल्या पाच वर्षांपासून ती आणि सोहेल वेगळे राहात आहेत. सीमा आणि सोहेल यांचे विचार, स्वभाव एकमेकांपासून खूपच वेगळे आहेत. त्या दोघांच्या नात्यामध्ये अनेक समस्या देखील आहेत.

वैवाहिक जीवनात वाद होणं हे सामान्य आहे. प्रत्येक जोडप्यात वाद होतातच. पण प्रत्येक वाद विकोपाला जातात तेव्हा नात्यात दुरावा येतो आणि अशा परिस्थितीत ते एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतात. घटस्फोट होण्यामागची कारणे वेग-वेगळी होऊ शकतात.

​एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर

जेव्हा एखादी व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असताना दुस-यासोबत संबंध ठेवते तेव्हा वैवाहिक आयुष्य खराब होऊ शकते अशा लोकांवर पुन्हा विश्वास ठेवणे खूप कठीण आहे. संबंध हे सर्वात मोठे कारण आहे.

​संवादाची समस्या

अनेक प्रकरणांमध्ये, घटस्फोटाचे एक कारण म्हणजे दोन व्यक्तींमध्ये खूप वादविवाद आणि एकमेकांशी त्यांच्या मनातले बोलू न शकणे. संवादाची ही समस्या घर, जबाबदारी किंवा इतर कोणत्याही कारणामुळे देखील असू शकते. कोणचेच विचार सारखे नसतात त्यामुळे या गोष्टीमुळेही वाद होऊ शकतात.

​जास्त अपेक्षा

कोणत्याही नात्यात वेळ जास्त आला की लोक एकमेकांकडून अपेक्षा ठेवायला लागतात. कधी कधी अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे नात्यात कटुता निर्माण होते. आणि नात्यात दुरावा येऊ लागतो.

​सेल्फ रिस्पेक्ट

जेव्हा दोन लोक एकत्र राहू लागतात, तेव्हा ते सर्व प्रकारच्या गोष्टी, आनंद, दुःख शेअर करतात. यामुळे दोघेही एकमेकांसोबत एकदम मोकळे होतात. अशा स्थितीत अनेकदा एखादी व्यक्ती असे काही बोलते ज्यामुळे समोरच्या व्यक्तीचे मन दुखावते. यावेळी सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा असतो.

Leave a Comment

Your email address will not be published.