मनमाडमधील शाळांच्या विद्यार्थ्यांनी घेतला अंतराळ विज्ञानाचा अनुभव:विद्यार्थ्यांनी अनुभवले अंतराळ गूढ
इस्रोच्या विद्यमाने मनमाडमधील येवला रोड संकुलात ‘स्पेस ऑन व्हील’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना अंतराळ सहलीचा आनंद मिळाला. इस्त्रो संस्थेच्या विज्ञानावर आधारीत बसचे उद्घाटन मविप्रचे संचालक अमित बोरसे पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून मनमाड नगर परिषदेतील प्रशासकीय अधिकारी मनीष गुजराथी होते. व्यासपीठावर बाळासाहेब साळुंखे, सुनील गवांदे, डॉ. पुंजाराम आहेर, व्ही. एफ. खान उपस्थित होते. प्राचार्य डॉ. डी. डी. गव्हाणे यांनी या मॉडेलचे सखोल अध्ययन करावे, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. बालसुधार गृहातील मुलांनी इस्रोच्या बसचा आनंद लुटला. सूत्रसंचालन प्रा. उषा जाधव तर आभार प्राचार्य डॉ. डी. डी. गव्हाणे यांनी मानले. मुख्याध्यापक राहुल वाघ, प्राचार्या प्रियंका धात्रक यांनी परिश्रम घेतले. यात छत्रे हायस्कूल, मनोरमा सदन उच्च प्राथमिक शाळा, बी. जी दरगुडे इंग्लिश मीडियम स्कूल, के. आर. टी. हायस्कूल, एच. ए. के. हायस्कूल, सेंट झेवियर्स, व्ही. एन. नाईक, इंडियन हायस्कूल, लिटल इंग्लिश मीडियम स्कूल, होरायझन अकॅडमी सहभागी झाल्या होत्या. प्रतिनिधी | दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील पीएमश्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी इस्त्रोच्या ‘स्पेस ऑन व्हील’ या अनोख्या चालत्या फिरत्या प्रदर्शनातील अंतराळ विज्ञानाचा अनुभव घेत विज्ञानाचे धडे घेतले. विज्ञान भारतीतर्फे ‘स्पेस ऑन व्हील’ हा अंतरिक्ष महायात्रा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये अंतराळ विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी तसेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्त्रो) सविस्तर माहिती मिळावी या उद्देशाने आयोजित या उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान भारतीच्या सदस्य मीना माळगावकर, नेहरू सायन्स सेंटरचे माजी वैज्ञानिक विठ्ठल रायगावकर, माजी प्राचार्य संजय लोडम उपस्थित होते. यावेळी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नोत्तरी स्पर्धा घेण्यात आली. ‘स्पेस ऑन व्हील’सोबतच्या वैज्ञानिकांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य एल. वाय. बोऱ्हाडे, प्राचार्य एस. व्ही. स्वामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इस्त्रोच्या या बसमुळे विद्यार्थी समाधानी दिसले