सुनेत्रा पवार-युगेंद्र पवार बारामतीत आले आमनेसामने:पुतण्याने काकींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
बारामती नगरपालिका आवारात अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार हे राजकीय विरोधक आमनेसामने पाहायला मिळाले. यावेळी युगेंद्र पवार यांनी नात्यांची जाण ठेवत काकींच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. युगेंद्र पवार यांनी विरोधक असलेल्या काकींच्या पाया पडून आशिर्वाद घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त बारामती येथील नगरपालिका आवारातील पुतळ्याला विविध मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार अचानक एकाचवेळी एकमेकांसमोर आले. सुनेत्रा पवार समोर येताच युगेंद्र पवार यांनी राजकारणाचा कोणताही अडसर न ठेवता काकींना नमस्कार करत पाया पडून आशीर्वाद घेतले. यावरुन युगेंद्र पवार यांनी राजकीय संस्कृती जपत साधेपणाचे दर्शन घडवले, असे बोलले जात आहे. बारामतीत पवार विरुद्ध पवार?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत पहायला मिळाली होती. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला होता. आता विधानसभेला शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. हेही वाचा…
निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना धक्का:शरद पवारांच्या भेटीनंतर विलास लांडेंचे ठरले, विधानसभेला तुतारी फुंकणार अजित पवार गटातील नेते आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे तसेच भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर विलास लांडे हे तुतारी फुंकणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. सविस्तर बातमी वाचा… माझा फोन इनकमिंगसाठी सदैव चालू:एखाद्याला ब्लॉक करण्याला लोकशाही म्हणत नाहीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे सूचक विधान
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील इनकमिंग वाढल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला फोन इनकमिंगसाठी सदैव सुरू असल्याचे सूचक विधान केले आहे. माझा फोन इनकमिंगसाठी सदैव चालू असतो. एखाद्याला ब्लॉक करण्याला किंवा फोन बंद करण्याला लोकशाही म्हणत नाहीत, असे त्या म्हणाल्यात. भाजप जुना पक्ष पक्ष असला तरी आजही त्यांच्या पक्षात टॅलेन्ट दिसत नाही, असेही त्या यावेळी भाजपवर निशाणा साधताना म्हणाल्या. सविस्तर बातमी वाचा…