Ganesh Chaturthi 2022 : लालबागच्या राजाला पहिल्या दिवशीच भक्तांची गर्दी, पाहा लाईव्ह VIDEO

 

मुंबई : राज्यभरात आजपासून गणेशोत्सवाची धूम सुरू असताना दहा दिवस चालणाऱ्या या बाप्पाच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात याला विशेष महत्त्व असून २ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर कोणत्याही निर्बंधाशिवाय यंदा गणपती बाप्पा आले आहेत. अशा स्थितीत लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, मुंबईतील लालबागचा राजा येथे गणेश चतुर्थीच्या उत्सवात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

मुंबई महानगरपालिकेने उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व तयारी केली असून करोनाच्या महामारीमुळे दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच कोणत्याही निर्बंधाशिवाय हा महोत्सव आयोजित केला जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) इतर उपायांसह शहरातील २४ प्रभागांमध्ये १८८ नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत तर विसर्जन स्थळांवरही ७८६ जीवरक्षक तैनात करण्याची योजना आहे.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या सहकार्याने उत्सव शांततेत पार पडावा यासाठी अधिकाऱ्यांसह किमान १०,००० कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. निर्देशांचे पालन करा. मुंबईकरांव्यतिरिक्त, मुंबई महानगर क्षेत्र आणि इतर शहरांमधून हजारो लोक प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ यासह विविध मंडळाला भेट देऊन गणपतीला वंदन करतात. यासाठी आतापासून लालबागच्या राजाला भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.

लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहिल्याच दिवसापासून गर्दी केली आहे. पाहा याच गर्दीचा एक छोटासा व्हिडिओ. खरंतर, करोनानंतर यंदा लोक मोठ्या उत्साहात आहेत.

 

Leave a Comment

Your email address will not be published.