तेव्हा सोमय्यांना अडवण्यासाठी इरेला पेटलेले पोलीस आता म्हणतात, ‘त्या’ कारवाईबाबत पश्चाताप वाटतो

Maharashtra Politics: या कारवाईवेळी पोलिसांची दादागिरी सुरू असल्याचंही सोमय्या म्हणाले होते. किरीट सोमय्या यांनी पोलिसांवर विविध प्रश्नांची सरबत्ती करत, ठाकरे सरकारवर जोरदार टीका देखील केली होती. किरीट सोमय्या यांना CSMT स्थानकावर रोखण्यात आले होते. या सगळ्यामुळे तेव्हा बराच गदारोळ झाला होता. मात्र, आता राज्यात नवे सरकार येताच पोलिसांच्या भूमिकेत बदल झालेला दिसत आहे.

 

किरीट सोमय्या

हायलाइट्स:

  • किरीट सोमय्या यांना ट्रेनमध्ये चढण्यापासून रोखण्यासाठी जी कारवाई करण्यात आली
  • त्याबद्दल आम्हाला पश्चाताप वाटतो
  • दापोली पोलिसांनाही किरीट सोमय्यांचा इशारा
मुंबई: राज्यात सत्तापालट झाल्यानंतर आता राजकीय आणि प्रशासकीय परिस्थितीमध्येही बदल पाहायला मिळत आहेत. गेल्या सरकारच्या काळात असलेल्या भूमिका आणि धोरणांमध्ये ३६० अंशांचा बदल झालेला दिसत आहे. असाच काहीसा प्रकार भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याबाबत घडला आहे. ठाकरे सरकारच्या काळात हसन मुश्रीफ यांचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी किरीट सोमय्या कोल्हापूरला जाणार होते. त्यावेळी पोलिसांनी किरीट सोमय्या यांना महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला जाण्यासा मज्जाव केला होता. किरीट सोमय्या यांना CSMT स्थानकावर रोखण्यात आले होते. या सगळ्यामुळे तेव्हा बराच गदारोळ झाला होता. मात्र, आता राज्यात नवे सरकार येताच पोलिसांच्या भूमिकेत बदल झालेला दिसत आहे.

मुंबई पोलिसांनी याबाबत भाष्य गेले आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात किरीट सोमय्या यांना ट्रेनमध्ये चढण्यापासून रोखण्यासाठी जी कारवाई करण्यात आली त्याबद्दल आम्हाला पश्चाताप वाटतो, अशी जाहीर कबुली पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या या बदललेल्या भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नेमकं काय घडलं होतं?

गेल्यावर्षी किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यावेळी सोमय्या यांनी कोल्हापूरमध्ये जाऊन हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत किरीट सोमय्या यांना सुरुवातीला त्यांच्या घराबाहेर आणि नंतर सीएसएमटी स्थानकावर रोखून धरले होते. मात्र, तुम्ही मला कोल्हापूरच्या वेशीवर अडवू शकता, इथे मुंबईत नाही, असं म्हणत सोमय्या रेल्वेत बसले व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले होते.

दापोली पोलिसांनाही किरीट सोमय्यांचा इशारा?

मला मागच्या दौऱ्यात दापोलीत अडवून गुन्हा दाखल करणाऱ्या दापोली पोलीसांना आता अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करावाच लागेल. तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या आदेशानुसार मागच्या दौऱ्यात जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आम्हाला दिलेली वागणूक आम्ही विसरलो नाही, हे लक्षात ठेवा अशीही आठवण सोमय्या यांनी दापोली शनिवारी दौऱ्यावर करुन दिली होती.

Leave a Comment

Your email address will not be published.