आता फक्त स्टॉक संपेपर्यंत मिळतील हे ४ आयफोन्स, Apple कडून प्रोडक्शन बंद

नवी दिल्लीः Apple ने गेल्या आठवड्यात फार आउट इव्हेंट मध्ये iPhone 14 Series ला लाँच केले आहे. कंपनीने नवीन सीरीज सोबत मिनी मॉडलला हटवले आहे. याशिवाय, ६.७ इंचाच्या मोठ्या डिस्प्ले सोबत प्लस व्हेरियंट आणले आहे. नवीन आयफोन्सच्या लाँचिंग नंतर काही दिवसातच Apple ने आपल्या चार जुन्या ऑयफोन मॉडलचे प्रोडक्शन बंद करीत असल्याची घोषणा केली आहे. कंपनी कोणत्या मॉडलला बंद करीत आहे. टेक कंपनी Apple आता iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max, iPhone 12 mini आणि iPhone 11 ची विक्री करणार नाही.

या सर्व आयफोन्सला Apple च्या अधिकृत वेबसाइटवरून हटवले आहे. हे होणार होते. कारण, Apple आपल्या जुन्या iPhone मॉडलला नवीन लाँचिंग नंतर बंद केले होते. जर वरील चार आयफोन मॉडलपैकी तुम्हाला एक खरेदी करायचा असेल तर तुम्ही हा आयफोन स्टॉक असेपर्यंत देशातील ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून आणि रिटेल स्टोरवरून खरेदी करू शकता.

फ्लिपकार्ट – अमेझॉन वर फक्त स्टॉक संपेपर्यंत मिळतील हे ४ मॉडल
Apple iPhone 11 ला २०१९ मध्ये लाँच करण्यात आले होते. यात ६.१ इंचाचा लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे. हा फोन A13 बायोनिक चिपसेट सोबत येतो. सध्या हा आयफोन अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर ४१ हजार ९९० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. याच प्रमाणे iPhone 12 mini ला अमेझॉन आणि फ्लिपकार्ट अशा दोन्ही वेबसाइटवरून खरेदी करू शकता. अमेझॉन वर फोनचे १२८ जीबी स्टोरेज मॉडलला ५९ हजार ४९० रुपये किंमतीत विकले जात आहे. फ्लिपकार्टने ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटला ५५ हजार ५३९ रुपयात लिस्ट करण्यात आले आहे. स्मार्टफोन ५.४ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिले आहे. हा फोन A14 बायोनिक प्रोसेसर सोबत येतो.

दुसरीकडे Apple iPhone 13 Pro, A15 बायोनिक चिपसेट सोबत येतो. फोनचे १२८ जीबी स्टोरेजचे व्हेरियंट अमेझॉनवर १ लाख ८ हजार ९०० रुपये (सिएरा ब्लू) मध्ये विकले जात आहे. तर फ्लिपकार्ट याला १ लाख १९ हजार ९०० रुपये किंमतीत विक्री करीत आहे. iPhone 13 Pro Max कंपनीचे २०२१ चा सर्वात महाग आयफोन होता. हा फोन A15 बायोनिक प्रोसेसर सोबत येतो. फोनमध्ये ६.७ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले सोबत येतो. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. १२८ जीबी क्षमतेच्या बेस मॉडलला आता फ्लिपकार्ट वर १ लाख २९ हजार ९०० रुपये किंमतीत विकत आहे. तर अमेझॉन या व्हेरियंटला १ लाख १९ हजार ९०० रुपये किंमतीत विक्री करीत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published.